पुणे : खरेदी केलेल्या प्लास्टिक थाळीचे पैसे मागितल्याने टोळक्याने एका दुकानदारासह दोघांवर तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याची घटना बिबवेवाडी भागात घडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – “आपण काय करतोय? मलाही वाईट वाटतं, मी…”, शरद पवारांचं ‘ते’ उदाहरण देत अजित पवारांनी व्यक्त केली खंत

धर्माराम बंजारा (वय २२, रा. सुखसागरनगर, बिबवेवाडी), मलंगराम बंजारा अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. याबाबत बंजारा यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बंजारा यांचे अप्पर इंदिरानगर भागात अंबिका डिस्पोझिबल अँड बर्थडे हाऊस दुकान आहे. प्लास्टिकचे ग्लास, थाळी, चमचे तसेच वाढदिवसाचे सजावट साहित्याची बंजारा विक्री करतात. बंजारा यांच्या दुकानात प्लास्टिक थाळी खरेदी करण्यासाठी चौघेजण आले. बंजारा यांनी थाळीचे पैसे मागितले. आरोपींनी पैसे देण्यास नकार देऊन बंजारा यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. बंजार यांना काठीने मारहाण करून त्यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले, तसेच दुकानात असलेल्या मलंगराम याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून टोळके पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक एस. एम. आदलिंग तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In bibwewadi two people including a shopkeeper were attacked with sharp weapons by a gang pune print news rbk 25 ssb