पुण्याच्या चाकणमध्ये ‘हॉटेल मराठा’च्या मालकावर दोघांनी गोळीबार केल्याचं समोर आलं आहे. स्वप्नील उर्फ सोप्या संजय शिंदे अस गोळीबारात जखमी झालेल्या हॉटेल मालकाचे नाव आहे. सुदैवाने यात तो थोडक्यात बचावला आहे. या प्रकरणी राहुल पवार आणि अजय गायकवाडवर गोळीबार केल्याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी अजय गायकवाडला चाकण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

इंदापूर येथे हॉटेलमध्ये बसलेल्या एका व्यक्तीची गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली होती. अशाच प्रकारे चाकणमध्ये हत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने यात तो व्यक्ती बचावला आहे.

हेही वाचा… खळबळजनक : मुलीची हत्या करत पित्याने घेतला गळफास, पिंपरीतील थेरगाव परिसरातील घटना

हेही वाचा… वसंत मोरे म्हणतात “मी थोडासा वेळ घेतोय, पण माझी वेळ… “

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चाकणच्या रासे येथे दोघांनी रात्री साडेदहाच्या सुमारास हॉटेल मालक स्वप्नील याच्यावर गोळीबार करण्यात आला. यात सुदैवाने स्वप्नील हा थोडक्यात बचावला आहे. या घटनेत तो किरकोळ जखमी झाला आहे. आरोपी राहुल पवारच्या भावाची चार महिन्यांपूर्वी हत्या करण्यात आली होती. या गुन्ह्यात स्वप्नीलने मदत केल्याच्या संशयावरून त्याच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. स्वप्नीलच्या दिशेने दोन गोळ्या झाडण्यात आल्या. यात तो किरकोळ किरकोळ जखमी झाला आहे. स्वप्नील हा देखील सराईत गुन्हेगार आहे अशी माहिती चाकण पोलिसांनी दिली आहे.

Story img Loader