पिंपरी : चिंचवड विधानसभेची जागा पक्षाकडे घेण्याची मागणी करूनही काेणतीही चर्चा न करता भाजपला जागा साेडल्यामुळे राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या माजी नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. काेणत्याही परिस्थितीत भाजप उमेदवाराचे काम केले जाणार नाही, असा इशारा देतानाच महाविकास आघाडीतून आमच्यापैकी ज्याला उमेदवारी मिळेल, त्याचे एकदिलाने काम करण्याची भूमिका माजी नगरसेवकांनी स्पष्ट केली. त्यामुळे भाजप उमेदवार शंकर जगताप यांच्या अडचणीत वाढ हाेण्याची चिन्हे आहेत.

गृहकलह मिटल्याने चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप यांच्याऐवजी त्यांचे दीर भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघ निर्मितीपासून जगताप कुटुंबीयांचा बालेकिल्ला राहिला आहे. चिंचवडमधून लक्ष्मण जगताप एकदा अपक्ष आणि दोनदा कमळावर असे तीन वेळा निवडून आले होते. जानेवारी २०२३ मध्ये त्यांच्या निधनामुळे झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप निवडून आल्या. आता भाजपमधील माजी नगरसेवकांच्या एका गटाने जगताप कुटुंबातील घराणेशाहीला उघडपणे विराेध केल्यानंतरही शंकर जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे नाराज झालेल्या स्वपक्षातील माजी नगरसेवकांची समजूत काढण्याचे आव्हान असतानाच महायुतीतील घटक पक्ष राष्ट्रवादीने प्रचार न करण्याची भूमिका घेऊन जगताप यांच्या अडचणीत भर घातली.

MVA allegation is that money is being distributed to the police by BJP Pune news
भाजपकडून पाेलीस बंदाेबस्तात पैशांचे वाटप? ‘मविआ’चा आरोप, महायुतीचेही प्रत्युत्तर..
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Priyanka Gandhi statement regarding those who show BJP flags during road shows
रोड-शो दरम्यान भाजपचे झेंडे दाखवणाऱ्यांना प्रियंका गांधी म्हणाल्या, तुम्हाला शुभेच्छा मात्र…
Arjuni Morgaon Constituency , Ajit Pawar, Manohar Chandrikapure,
विदर्भात अजित पवारांची भाजपकडून कोंडी
Kothrud Assembly Constituency Assembly Election 2024 Division of Hindutva votes between BJP Shiv Sena Thackeray and MNS Pune news
‘सुरक्षित’ असूनही भाजपची कसोटी
Ajit Pawar on Yogi Adityanath
योगी आदित्यनाथांमुळे अजित पवारांची गोची; मोदी-शाहांची एकही सभा नाही; अस्तित्वाची लढाई राष्ट्रवादी कशी लढणार?
sharad pawar reaction on bjp batenge to katenge slogan
नाव घेतले तर न्यायाल्यात खेचीन ‘ कोणी ‘ पाठविली शरद पवार यांना नोटीस !
sharad pawar nagpur, Sharad Pawar visits Nagpur,
पवार यांचा नागपूर दौरा, भाजपला इशारा अन् कॉंग्रेस नेत्यांशी खलबते

हेही वाचा : मावळमध्ये आमदार सुनील शेळके, भाजपमधील वाद फडणवीसांच्या दरबारात

पाेटनिवडणुकीत लाखभर मते घेतलेले आणि विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले माजी विराेधी पक्षनेते नाना काटे म्हणाले, की उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार माझी निवडणुकीची तयारी सुरू हाेती. परंतु, भाजपचा उमेदवार जाहीर झाला. त्यामुळे आम्हाला दिलेला शब्द पाळला नसल्याची खंत आहे. आमच्याशी काेणतीही चर्चा न करता भाजपला जागा साेडली. आम्ही सर्व माजी नगरसेवक एकत्र आहाेत. भाऊसाहेब भाेईर, माेरेश्वर भाेंडवे हेही आमच्यासाेबत आहेत. महाविकास आघाडीकडून आमच्यापैकी काेणालाही एकाला उमेदवारी मिळाल्यास त्याचे सर्वजण एकदिलाने काम करणार आहाेत. प्रशांत शिताेळे म्हणाले, राष्ट्रवादीकडे सक्षम उमेदवार असताना पक्षाला जागा मिळाली नाही. दाेन दिवसात महाविकास आघाडीकडून चांगला निर्णय अपेक्षित आहे. तर, भाजपचे काम न करणा-यावर आम्ही ठाम असल्याचे मयूर कलाटे यांनी सांगितले.

हेही वाचा : भाजपनं आमदार अश्विनी जगतापांच तिकीट कापलं; दिर, शंकर जगतापांना उमेदवारी जाहीर…

भाजपही पिंपरीत राष्ट्रवादीचे काम करणार नाही

चिंचवड विधानसभा मतदार संघात महायुतीतील राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाने भाजपच्या उमेदवारांचा प्रचार न करण्याचा निर्णय घेतला, असेल तर पिंपरी विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे काम आम्ही करणार नाही, असा इशारा भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष तुषार हिंगे यांनी दिला आहे.