देहू : देहू संस्थानने देखील बागेश्वर धामचे धिरेंद्र शास्त्री महाराज यांना माफ करत माफी ही शिकवण संत जगद्गुरू तुकोबारायांची असल्याचं म्हटलं आहे. धिरेंद्र शास्त्री यांनी जगतगुरू संत तुकाराम यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. महाराष्ट्रात यावरून चांगलाच वाद सुरू होता. शास्त्रींच्या कार्यक्रमाला विरोध होत होता. अखेर देहूत येऊन तुकोबांच्या चरणी लीन होऊन धीरेंद्र शास्त्री यांनी माफी मागितल्याने यावर पडदा पडला आहे.
हेही वाचा : जागतिक साखर उत्पादनात ३५ लाख टन घट; जागतिक अन्न संघटनेचा अंदाज
देहू संस्थानचे विश्वस्त नितीन मोरे महाराज म्हणाले, बागेश्वर महाराज यांच्या वक्तव्याचा विपर्यास झाला. ज्या दिवशी त्यांनी वक्तव्य केलं त्याच दिवशी त्यांनी माफी मागितली होती. वारकरी संप्रदायाने प्रत्येक मनुष्याला जगण्याचा धडा शिकवलेला आहे. शांततेचे प्रतीक म्हणून वारकऱ्यांकडे पाहिलं जातं. बागेश्वर महाराज आज तुकोबांच्या दर्शनासाठी आले. पुण्यात आल्यानंतर त्यांनी केलेल्या वक्तव्यावर माफी मागितली. देहूत येऊन नतमस्तक होऊन त्यांनी माफी मागितलेली आहे. आम्ही देखील त्यांना माफ केले आहे. तुकोबारायांची शिकवणच आहे की समोरचा माणूस शांत असेल आणि तो जर अग्नी झाला तर आपण दगड व्हायला पाहिजे. अन्यथा त्या अग्नीचा भडका होणार आहे. असंही त्यांनी म्हटलं आहे