पुणे : मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे आणि मराठा समाजाचे शिष्टमंडळ केंद्रीय मागासवर्ग आयोगाची आज भेट घेणार आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन केले होते. जरांगे पाटील यांनी राज्य शासनाला त्यासाठी काही मुदत दिली असून त्यांच्या आंदोलनाला यश मिळविण्यासाठी विविध घटक, नेत्यांकडून प्रयत्न सुरु आहेत. त्यासंदर्भात छत्रपती संभाजीराजे आणि त्यांच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाची नुकतीच भेट घेतली होती.
हेही वाचा : नव्या वर्षात किमान सहा जोडसुट्ट्यांची मेजवानी
मराठा समाजाला न्याय मिळावा, यासाठी सर्व स्थरावर संभाजीराजे मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत असून कायदेशीर प्रक्रिया माहिती असल्याने संभाजीराजे त्यासाठी पाठपुरावा करत आहेत. त्यासाठी छत्रपती संभाजीराजे आज दुपारी ३ वाजता दिल्ली येथील केंद्रीय मागासवर्ग आयोगात आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांची भेट घेणार आहेत.