भविष्यात उद्योगांना जागांचा प्रश्न मोठय़ा प्रमाणावर भेडसावणार आहे, ही समस्या लक्षात घेऊन एमआयडीसीने औद्योगिक परिसरात एकाच ठिकाणी अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे, असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले.
भारत विकास परिषद, लघुउद्योग भारती आणि सीए इन्स्टिटय़ूट यांच्या संयुक्त विद्यमाने निगडीत आयोजित परिषदेत ते बोलत होते. विजय लाटकर, रवींद्र सोनवणे, महेश्वर मराठे, दत्तात्रय चितळे उपस्थित होते. बापट म्हणाले,की लघुउद्योग देशाच्या आर्थिक विकासातील महत्त्वाचा ठेवा आहे. मात्र, लघुउद्योजकांसमोर अनेक प्रश्न असून ते सोडवण्याची जबाबदारी सरकारप्रमाणेच अन्य संस्थांची देखील आहे. परिषदेत ‘बँकिंग शिस्त’ या विषयावर विद्याधर अनास्कर, ‘कामगार कायदा’ या विषयावर अॅड. राजीव जोशी, ‘लघुउद्योग विकास कायदा २००६’ या विषयावर सीए मराठे यांनी मार्गदर्शन केले.

Story img Loader