पुणे : विसर्जन मिरवणूक रद्द करून गुरुवार पेठेतील हिंद युवक मित्र मंडळाने आरोग्य जागर करीत शैक्षणिक आणि वैद्यकीय उपक्रम आयोजित केले आहेत.मिरवणुकीत होणारा खर्च हा गरजूंना शैक्षणिक मदतीसाठी आणि आरोग्यविषयक जनजागृतीसाठी व्हावा, या उद्देशाने दहा दिवस विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
समाजातील अनेक कुटुंबांना आरोग्यविषयक खर्च परवडणारा नसतो. ही बाब ध्यानात घेऊन तब्बल १२० जणांना मोफत शहरी गरीब वैद्यकीय साहाय्य योजना मोफत कार्ड देण्यात येणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष रोहन शिंदे आणि उपाध्यक्ष हरी मेमाणे यांनी गुरुवारी दिली.
हे ही वाचा…खुनाच्या प्रयत्नातील पसार आरोपी दोन तासात जेरबंद
गणेशोत्सवात रविवारी (८ सप्टेंबर) आरोग्य आणि रक्तदान शिबिर होणार आहे. शिबिरात रक्ततपासणी, मोफत नेत्रतपासणी, मोफत चष्मावाटप, मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया आणि महिलांसाठी मोफत स्तन कर्करोग तपासणीदेखील करण्यात येईल. सोमवारी (९ सप्टेंबर) देवदासींच्या मुलांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.