पुणे शहरात मागील काही महिन्यापासून गाड्यांची तोडफोड करण्याच्या घटनामध्ये वाढ झाली असून यामुळे नागरिकामध्ये भीतीचे वातावरण पाहण्यास मिळत आहे. असाच प्रकार हडपसर येथील ससाणेनगर भागात एका टोळक्याने कोयते आणि तलवारीने 10 ते 12 गाड्यांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. या घटने मुळे हडपसर परिसरात एकच खळबळ उडाली असून या घटनेतील आरोपींना पोलिसांच्या ताब्यात नागरिकांनी दिले असता. तेथून एक आरोपी पसार झाल्याची घटना घडली. घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून या घटनेचा हडपसर पोलीस तपास करीत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर येथील ससाणे नगर मधील गल्ली नंबर 10 मध्ये काल रात्री च्या सुमारास चार ते पाच जणांच्या टोळकयाने हातामध्ये तलवारी आणि कोयते घेऊन 10 ते 12 गाड्या ची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. या मध्ये दुचाकी आणि चार चाकी गाड्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या प्रकरणातील आरोपी ओंकार गिरमे , निखिल तिकोटे , श्रीकांत जाधव , औदुंबर बिराजदार , महेश गायकवाड आणि इतर तीन जणांना नागरिकांनी पकडून पोलिसांच्य ताब्यात दिले. यावेळी सत्तुर्या उर्फ राजेश नेवसे हा आरोपी तेथून पसार झाला आहे. त्याचा शोध घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.