हडपसर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरुर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) खासदार अमोल कोल्हे यांच्या मतदारसंघात येणार्‍या हडपसर विधानसभा मतदारसंघातील मांजरी भागातील विकास कामांची पाहणी केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते. पत्रकारांनी अजित पवार यांना पुन्हा एकदा अमोल कोल्हेंना दिलेल्या आव्हानाबाबत प्रश्न विचारला. त्यावेळी “कालच्या चॅलेंजच्या आणि आजच्या शिरुरमधील कार्यक्रमाचा काही संबंध नाही. अमोल कोल्हे यांची प्रतिक्रिया आली असेल तर त्यांना लख लाभ! मी काल सांगितलं ते माझं फायनल”, असे पवार यांनी म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : “काही जणांना खासदार व्हायचंय”, अजित पवार संजोग वाघेरेंची नाराजी दूर करणार?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांना शिरुरमध्ये आगामी लोकसभेत अजित पवार गटाचा उमेदवार निवडून आणणार असे आव्हान दिले. त्यानंतर अजित पवारांनी काल (दि. २६ डिसेंबर) पुन्हा एकदा अमोल कोल्हेंना चॅलेंज देत, “आता बघा, अजित पवार एखादं चॅलेंज देतो त्यावेळेस जिंकूनच दाखवतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. निकाल लागल्यावर तुम्हाला कळेल”, असे म्हटले होते. आज सकाळी पवार यांनी शिरुर लोकसभा मतदार संघात येणार्‍या मांजरी येथील उड्डाण पूल आणि अन्य विकास कामांची पाहणी केली. खासदार अमोल कोल्हेंना दिलेल्या आव्हानानंतर दुसऱ्याच दिवशी अजित पवार शिरुर लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यामुळे राजकीय चर्चांना उधान आले आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) नेते विलास लांडे यांनी शिरुर लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असल्याचे म्हटले आहे. याबाबत लवकरच अजित पवार यांची भेट घेणार असल्याचे लांडे यांनी माध्यमांना सांगितले.