पुणे : गणेश विसर्जनासाठी गेलेला सोळा वर्षांचा मुलगा नीरा नदीत बुडाल्याची घटना इंदापूर तालुक्यातील श्री क्षेत्र निरा नरसिंहपूर गावात घडली. बुडालेल्या मुलाचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे.

बुडालेला मुलगा हा मूळचा धाराशिव जिल्ह्यातील परांड्यातील हांडुग्री या गावचा रहिवासी आहे. तो गेल्या नऊ वर्षांपासून श्री क्षेत्र नीरा नरसिंहपूर येथील एका वेदपाठ शाळेत शिक्षण घेत आहे. गणेश विसर्जनासाठी तो गेला असताना नदीत बुडाल्याची घटना घडली. हा प्रकार घडल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

हेही वाचा : पिंपरी : मूर्तीदान उपक्रमाला प्रतिसाद; घरगुती गणपती विसर्जनासाठी घाटावर गर्दी

घटनास्थळी पोलिसांबरोबरच गावकरी, पोलीस, महसूल प्रशासन दाखल झाले आहे. बोटीच्या साह्याने त्याचा शोध घेण्यात येत आहे. मात्र, अंधार पडल्याने शोधकार्यात अडथळा निर्माण झाला असल्याचे इंदापूर पोलिसांकडून सांगण्यात आले.

Story img Loader