इंदापूर : नागरी संघर्ष समितीने इंदापूरकरांचे मांडलेले प्रश्न सोडविले गेले नाहीत, तर गरज पडल्यास आपण नगर परिषदेसमोर उपोषणाला बसू, असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी दिला. शहरातील विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीचे प्रा. कृष्णा ताटे आणि त्यांचे सहकारी २३५ दिवसांपासून इंदापूर नगरपालिकेसमोर धरणे आंदोलनाला बसले आहेत. ताटे यांनी सुळे यांच्यासमोर इंदापूर शहरातील नागरी प्रश्नांचा पाढा वाचला. त्या वेळी त्यांनी त्वरित मुख्याधिकारी कापरे यांच्याशी संपर्क साधला. इंदापूरकरांच्या विविध प्रश्नांसाठी राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाला सविस्तर निवेदन दिले असून, या प्रश्नांचा मी स्वतः पाठपुरावा करणार आहे. वेळ पडल्यास मी उपोषणाला बसेन, असा इशारा त्यांनी दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : ठोसा मारून खून करणाऱ्या महिलेला बेड्या

शहरातील घरपट्टी आणि पाणीपट्टीची व्याजआकारणी, घरकुलाचा प्रश्न, जोतिबा मंदिराशेजारील घनकचरा डेपोचा प्रश्न, तरंगवाडी तलावावरील बंद केलेला पाणीपुरवठा, वेंकटेशनगरमधील नागरिकांंच्या घरासंबंधीचे प्रश्न, इंदापूर शहराला उजनीतून होणारा अस्वच्छ पाणीपुरवठा, गाळेधारकावर होणारा अन्याय, ६०० चौरस फुटांच्या आतील घरांना लावलेला शास्तीकर आणि दंड तातडीने कमी करणे, सन २०१७-१८ च्या सर्वेक्षणामध्ये घरांची चुकीची झालेली मोजमापे तातडीने दुरुस्त करणे या मागण्यांसाठी नगरपालिकेसमोर इंदापूर नागरी संघर्ष समितीचे २३५ दिवसांपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. खासदार सुप्रिया सुळे यांची संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी भेट घेतली. पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने, हमीद आतार, प्रा. महादेव चव्हाण, संतोष जामदार, संदीपान कडवळे या वेळी उपस्थित होते.