इंदापूर : ऐन हिवाळ्यातच उजनी धरणाच्या पाणी पातळीत मोठी घट झाली आहे. धरणाचा पाणीसाठा ३५ टक्क्यांवर आला असून, सध्या उजनी मध्ये केवळ १८ टीएमसी (अब्ज घनफूट) पाणी चलसाठ्यात असून याच पद्धतीने पाण्याचा वापर झाला तर जानेवारी महिन्यातच धरण मोकळे होण्याची भीती व्यक्त होत आहे. आगामी दुष्काळाची दाहकता वेळीच ओळखून, शिल्लक पाण्याचे जबाबदारीने नियोजन न झाल्यास गंभीर समस्येला तोंड द्यावे लागणार आहे, असे चित्र आता स्पष्ट दिसत आहे. यावर्षी उजनी धरण पाणलोट क्षेत्रात पावसाळ्यात सुरूवातीला पावसाने दडी मारली होती. परतीच्या पावसात उजनी मध्ये केवळ ६० टक्के पाणीसाठा जमा झाला . धरणातून रब्बी हंगामाचे आवर्तन व भीमा सीना जोड कालव्यातून पाणी सोडण्याबरोबरच कार्तिकी एकादशीनिमित्त नदीपात्रातून पंढरपूरला पाणी सोडण्यात आल्यामुळे या आठवड्यात पाणी साठ्यात कमालीची घट होत पाणीसाठा ३५ टक्क्यांवर आला आहे.
हिवाळ्यातच उजनी धरण पस्तीस टक्क्यांवर
आगामी दुष्काळाची दाहकता वेळीच ओळखून, शिल्लक पाण्याचे जबाबदारीने नियोजन न झाल्यास गंभीर समस्येला तोंड द्यावे लागणार आहे, असे चित्र आता स्पष्ट दिसत आहे.
Written by तानाजी काळे
पुणे
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 25-11-2023 at 13:48 IST
TOPICSउजनी धरणUjani Damदुष्काळ (Drought)DroughtपाणीWaterपुणे न्यूजPune Newsमराठी बातम्याMarathi News
+ 1 More
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In indapur the water in ujani dam reservoir come down to 35 percent in winter pune print news vvk 10 css