पुणे : क्रिप्टो म्हणजेच आभासी चलन गुंतवणुकीत पुण्याने देशात यंदा पाचवा क्रमांक पटकाविला आहे. देशातील प्रमुख १० शहरांमध्ये सर्वाधिक परतावा मिळणारे आभासी चलन गुंतवणूकदारही पुण्यातीलच असल्याचे ‘कॉइनस्विच’ या आभासी चलन मंचाच्या अहवालातून समोर आले आहे.

‘कॉइनस्विच’ने ‘इंडियाज क्रिप्टो पोर्टफोलिओ २०२४ : हाऊ इंडिया इन्व्हेस्ट्स’ हा अहवाल जाहीर केला आहे. देशातील वैविध्यपूर्ण आभासी चलन परिसंस्था आणि डिजिटल मालमत्तेत वाढत असलेला सहभाग यावर या अहवालातून प्रकाश टाकण्यात आला आहे. या अहवालानुसार, देशातील प्रमुख १० शहरांमध्ये आभासी चलन गुंतवणुकीत पुणे पाचव्या स्थानी आहे. गुंतवणूकदारांमधील ७६ टक्के पुरुष आणि २४ टक्के महिला आहेत. पुण्यातील सर्वाधिक ३९ टक्के गुंतवणूकदारांकडून लार्ज कॅपला पसंती दिली जात आहे. त्या खालोखाल ब्ल्यू चिप ३१ टक्के, मिड कॅप २६ टक्के आणि स्मॉल कॅप ४ टक्के असे प्रमाण आहे. पुण्यातील ८६ टक्के गुंतवणूकदार फायद्यात, तर १४ टक्के गुंतवणूकदार तोट्यात आहेत.

what is the genome india project why it matters
विश्लेषण : जिनोमइंडिया प्रकल्प भारतासाठी किती महत्त्वाचा?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
JSW Share News
JSW Cement IPO ला सेबीचा हिरवा कंदील; ११ गोष्टी या ‘आयपीओ’बद्दल…
Fund Jigyaza Wealth Creation Through SIP
फंड जिज्ञासा – ‘एसआयपी’च्या माध्यमातून संपत्ती निर्मिती
Company DCX Systems Limited Overview in marathi
माझा पोर्टफोलिओ : देशाच्या संरक्षण सिद्धतेतील सच्चा भागीदार – डीसीएक्स सिस्टीम्स  
share market fraud loksatta news
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ४४ लाखांची फसवणूक
Inflow of Rs 41156 crore into equity funds in December Investment in small midcap funds contributed significantly
डिसेंबरमध्ये ‘इक्विटी फंडा’त ४१,१५६ कोटींचा ओघ; स्मॉल, मिडकॅप फंडातील गुंतवणुकीचे मोठे योगदान
massive dividend shareholders TCS IT company
मोठ्या आयटी कंपनीकडून भागधारकांना जबरदस्त ‘डिव्हीडंड’; अजूनही समभाग खरेदीची संधी

हेही वाचा : धोक्याची किनार! दादर, माहीम, आक्सा, मनोरी, गोराई, मार्वेचा समुद्रकिनारा असुरक्षित

देशातील आभासी चलन गुंतवणुकीत दिल्ली, बंगळुरू आणि मुंबई या शहरांचे वर्चस्व आहे. या शहरांचा क्रिप्टो गुंतवणुकीत वाटा अनुक्रमे २०.१ टक्के, ९.६ टक्के आणि ६.५ टक्के आहे. मागील वर्षीच्या तुलनेत या शहरांमध्ये गुंतवणुकीत लक्षणीय वाढ झाली आहे. कोलकता आणि गुजरातमधील बोतड या शहरांनी यंदा पहिल्यांदाच पहिल्या १० शहरांमध्ये स्थान मिळवले असून, ती अनुक्रमे नवव्या आणि दहाव्या स्थानावर आहेत. गुंतवणूकदारांचे प्राधान्य बिटकॉइन आणि इथरिअमसारख्या स्थिर डिजिटल मालमत्तांना असून, बिटकॉइनला ७ टक्के, तर इथरिअमला ६ टक्के गुंतवणूकदारांनी प्राधान्य दिले आहे. मीम कॉइन्सचा १३ टक्के वाटा असून, त्यात डॉजकॉइन ५५ टक्क्यांसह आघाडीवर आहे. पीईपीईने या वर्षी १३०० टक्के वाढ नोंदवत सर्वांत चांगली कामगिरी करणाऱ्या मालमत्तेमध्ये स्थान मिळवले आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

३५ वर्षांखालील गुंतवणूकदार जास्त

भारतातील आभासी चलन गुंतवणुकीत ३५ वर्षांखालील गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर सक्रिय असून, एकूण गुंतवणूकदारांपैकी ७५ टक्के याच वयोगटातील आहेत. याच वेळी ३६ ते ४५ वयोगटातील गुंतवणूकदारांची संख्याही सातत्याने वाढत आहे. गुंतवणूकदारांमध्ये महिलांचे प्रमाण तुलनेने कमी असून, एकूण गुंतवणूकदारांपैकी केवळ ११ टक्के महिला असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा : Sanjay Raut House : संजय राऊत यांच्या घराच्या रेकी प्रकरणी मुंबई पोलिसांकडून मोठी माहिती, “यामध्ये आढळलेले चार इसम…”

देशातील आभासी चलन गुंतवणूक (टक्क्यांमध्ये)

दिल्ली – २०.१

बंगळुरू – ९.६

मुंबई – ६.५

हैदराबाद – ५.१

पुणे – ३.५

जयपूर – ३.३

ठाणे – २.६

लखनौ – २.४

कोलकता – २.१

बोतड – १.९

इतर – ४२.९

चालू वर्षात बिटकॉइनने १ लाख डॉलरचा टप्पा पार करत २०२५ मधील प्रगतीच्या उत्साहवर्धक प्रवासाला सुरुवात करून दिली आहे. चालू वर्षातील कामगिरी पाहता पुढील वर्षात अधिक गती मिळेल आणि हे क्षेत्र नव्या शिखरावर पोहोचेल.

बालाजी श्रीहरी, उपाध्यक्ष, कॉइनस्विच

Story img Loader