पुणे : भारतीय हवामान विभागाने नुकतेच फेब्रुवारी महिन्यातील तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा आणि थंडीच्या लाटेची शक्यता नसल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. गव्हाच्या पिकासाठी थंडी पोषक असते. गहू पिकासाठी फेब्रुवारी महिना अत्यंत महत्त्वाचा असतो. गव्हाचे दाणे भरण्याच्या या काळात तापमानवाढीचा फटका बसल्यास गहू उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याच्या भीतीने गहू पट्ट्यातील शेतकरी धास्तावले आहेत.
भारतीय हवामान विभागाने फेब्रुवारी महिन्यात देशभरातील तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे; तसेच फेब्रुवारी महिन्यात थंडीची लाट येण्याची शक्यताही कमीच असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. फेब्रुवारी महिना गहू पिकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असतो. गव्हात दाणे भरण्याचा हा काळ असतो. अनेक ठिकाणी फेब्रुवारी अखेरपासून गव्हाची काढणी सुरू होते. या काळात थंडी, दव, धुके पडल्यास गव्हाची वाढ चांगली होते. गव्हाचे दाणे चांगले भरतात. टपोरे, दर्जेदार गहू उत्पादन होऊन वजनातही वाढ होते.
गेल्या काही वर्षांपासून फेब्रुवारी महिन्यात गहू लागवडीच्या पट्ट्याला उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसत आहे. उष्णतेच्या झळांमुळे गव्हाच्या उत्पादनात अंदाजाच्या तुलनेत मोठी तूट येत आहे. यंदा देशभरात ३४० लाख हेक्टरवर गव्हाची लागवड झाली आहे. प्रामुख्याने मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाणामध्ये लागवडीचे क्षेत्र जास्त असते. नेमक्या याच भागांना उष्णतेच्या झळांचा फटका बसून उत्पादनात घट होते. यंदा सुमारे ११४० लाख टन गहू उत्पादनाचा अंदाज आहे. मुळात मागील वर्षाच्या तुलनेत गहूलागवड सुमारे तीन हेक्टरने घटली आहे. त्यात पुन्हा उन्हाच्या झळांचा फटका बसला, तर गहू उत्पादन एक हजार लाख टनांच्या आतच राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा..लोकसभा आचारसंहितेपूर्वी मराठा सर्वेक्षणाचा अहवाल सरकारकडे
उत्पादनावर परिणाम होणार
फेब्रुवारी महिन्यात थंडीची शक्यता कमी आहे. ज्वारी, हरभरा आणि गहू ही मुख्ये पिके आहेत. ज्वारी, हरभरा पिकांच्या उत्पादनावर फारसा परिणाम होणार नाही. पण, गहूलागवड उशिरापर्यंत चालते. त्यामुळे गव्हाच्या उत्पादनावर काहीसा परिणाम होऊ शकतो. उशिराने लागवड झालेल्या कांदा पिकालाही फटका बसू शकतो, असेही, हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे म्हणाले.