जेजुरी वार्ताहर- खंडेरायाच्या जेजुरी नगरीमध्ये आज सकल मराठा समाजा च्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आले. मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी वाघ्या, मुरळी,गोंधळी यांनी जागरण गोंधळ घातला. जमलेल्या कार्यकर्त्यांनी शासनाचा तीव्र निषेध केला.
जेजुरीत नेत्यांना येण्यास बंदी
जेजुरीमध्ये कोणत्याही राजकीय नेते मंडळींनी कोणत्याही कार्यक्रमासाठी येऊ नये इशारा यावेळी देण्यात आला. पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली,यावेळी त्यांना मागण्यांचे पत्र देण्यात आले.सायंकाळी सहा वाजता पेटवलेल्या मेणबत्त्या हातात घेऊन कार्यकर्त्यांनी कॅण्डल मार्च काढला. यामध्ये महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. आजच्या आंदोलनात जेजुरी व पंचक्रोशीतील हजारो मराठा बांधवांनी सहभाग घेतला
एसटी बसवरील नेत्यांच्या फोटोना कार्यकर्त्यांनी फासले काळे
आजचे ठिय्या आंदोलन पुणे- पंढरपूर रस्त्यालगत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये होते,येथून राज्य परिवहन महामंडळाची बस जात असताना कार्यकर्त्यांनी अडवली. या बसवर राज्य सरकारच्या समृद्धी महामार्गाची जाहिरात होती या जाहिरातीमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे फोटो होते या फोटोंना काळे पासून त्यांचा निषेध करण्यात आला.