पुणे : जमीन खरेदीसाठी निघालेल्या दाम्पत्याकडील आठ लाखांची रोकड असलेली पिशवी चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना खराडी परिसरात घडली. याप्रकरणी दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत सुरेश नामदेव खंकाळ (वय ४५, रा. जयसिंग हाऊसजवळ, देहूरोड) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. खंकाळ पुणे स्टेशन परिसरातील एका रुग्णालयात कामाला आहेत. खंकाळ दाम्पत्य जमीन खरेदी करणार होते. व्यवहारासाठी त्यांनी बँकेतून आठ लाख १६ हजार रुपये काढले. पैसे पिशवीत ठेऊन खंकाळ दाम्पत्य सोमवारी दुपारी दुचाकीवरुन नगर रस्त्यावरील खराडी बायपास चौकातून केशवननगरकडे निघाले होते. चोरटे त्यांच्या मागावर होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तलाठी भरतीमध्ये मोठी अपडेट

आर. के. बिअर शाॅपीसमोर दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी खंकाळ यांच्याकडील रोकड ठेवलेली पिशवी चोरून नेली. चोरटे मुंढव्याकडे पसार झाले. पिशवीत आठ लाख १६ हजारांची रोकड, आधारकार्ड, धनादेश पुस्तिका असा मुद्देमाल होता. या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, सहायक आयुक्त संजय पाटील, पोलीस निरीक्षक मनीषा पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत असून, उपनिरीक्षक तानाजी शेगर तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In kharadi 8 lakhs stolen from a couple who were going to purchase land pune print news rbk 25 css