लोणावळ्यात मुसळधार पाऊस झाला असून गेल्या २४ तासात तब्बल २२० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. आत्तापर्यंत एकूण एक हजार ५२२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली असून ही गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत एक हजार १७६ मिमी एवढा पाऊस झाला होता. जून महिन्यात पावसाने दडी मारली. परंतु, जुलै महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावत लोणावळा, मावळ येथील नागरिकांना झोडपून काढलं आहे. नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. मावळ परिसरात अनेक ठिकाणी शेताला तलावाचे स्वरुप आले आहे तर काही ठिकाणी रस्त्याला नदीचे रूप आले आहे.

गेल्या सहा दिवसात ९५२ मिमी पाऊस कोसळला आहे. हवामान खात्याने वर्तविलेला अंदाज अचूक ठरला असून मुसळधार पावसाने भुशी धरण ओव्हर फ्लो झालं आहे. पाऊस असाच सुरू राहिल्यास मावळातील शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट येथे पर्यटकांची तुफान गर्दी होत आहे. विकेंडला तर लाखो पर्यटक लोणावळा शहराला भेट देत आहेत. यामुळं होत असलेली गर्दी, वाहतुक कोंडी यावर नियंत्रण ठेवण्याची कसरत पोलिसांना करावी लागत आहे.

air pollution in Mumbai news
मुंबईची हवा पुन्हा प्रदूषित; कुलाबा, कांदिवली येथे ‘वाईट’ हवेची नोंद
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
possibility of cloudy weather in maharashtra due to low pressure area formed in bay of bengal
रविवारपासून पुन्हा ढगाळ वातावरण; जाणून घ्या, थंडीची लाट, कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम
water cut in Thane on Friday Water supply will be provided in phases for two days
ठाण्यात शुक्रवारी पाणी नाही; काही भागात दोन दिवस टप्प्याटप्प्याने होणार पाणीपुरवठा
Two months ago Thane Municipal Corporation requested bmc for 50 million liters of water
ठाण्याला वाढीव पाण्याची प्रतिक्षा, मुंबई महापालिकेकडून वाढीव पाण्याबाबत अद्याप निर्णय नाही
Mumbaikars await cold weather
थंडी पुन्हा कमी होण्याची शक्यता?
temperature declined in central Maharashtra
उत्तर महाराष्ट्र गारठला, मध्य महाराष्ट्रातील पारा खाली
minimum temperatures in north Maharashtra
Maharashtra Weather Update : थंडीत आणखी वाढ होणार ? जाणून घ्या, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रासाठीचा अंदाज
Story img Loader