लोणावळा : वाकसई, देवघर, करंडोली, जेवरेवाडी गावाच्या वरील बाजूला असलेल्या डोंगर भागात बकऱ्या चारणाऱ्या एकाच्या बकऱ्यांच्या खाण्यात काहीतरी आल्याने रविवारी मध्यरात्रीनंतर सोमवारी सकाळपर्यंत जवळपास १४६ बकऱ्यांचा मृत्यू झाला. काळुराम शिवाजी बरकडे (मु. वनकुट ता. पारनेर जि. नगर) हे आपल्या बकऱ्यांचा वाडा घेऊन वाकसई, देवघर, करंडोली, जेवरेवाडी, वेहेरगाव, वरसोली या ठिकाणी शेतात बसतात आणि आपला उदरनिर्वाह करतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : धक्कादायक : मुद्देमाल कक्षात पोलिसांचाच ‘दरोडा’

रविवारी त्यांच्या बकऱ्यांच्या खाण्यात काहीतरी आल्याने मध्यरात्रीनंतर त्यांना त्रास होऊ लागला. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. याबाबत त्यांनी गावात कळवल्यानंतर गावातील नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी मावळ तालुका पशू वैद्यकीय अधिकारी यांना बोलावून घेतले. वैद्यकीय पथकाने मागील दोन दिवस  बकऱ्या वाचवण्यासाठी प्रयत्न केले. अचानक मोठ्या प्रमाणात बकऱ्या मरण पावल्याने धनगर बंधूवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शासनाने याची दखल घेत नुकसानग्रस्त पशुपालकाला शासकीय पातळीवरून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जात आहे. तसेच करंडोली आणि आजूबाजूच्या भागातील नागरिकांनी मदतीचा हात पुढे करत नुकसानग्रस्ताला मदत करण्याचे आवाहन केले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In lonavala 146 goats died due to food poisoning pune print news vvk 10 css