पिंपरी- चिंचवड: राजकारणात कुणी- कुणाचा शत्रू नसतो हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. लोणावळा कार्ला आई एकविरा देवी ट्रस्टच्या विश्वस्तपदी शरद पवार गटाचे खासदार बाळ्या मामा म्हात्रे यांची वर्णी लागली आहे. यासाठी अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके हे या निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. शेळके यांच्यामुळे बाळ्या मामा हे आई एकविरा देवीच्या विश्वस्तपदी निवडून आले आहेत. बाळ्या मामा यांनी स्वतः शेळके यांचे आभार मानले आहेत. आमच्या दोघांचे पक्ष वेगळे असले तरी दोघांमधील हे प्रेम वेगळं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : ठरलं! पिंपरी- चिंचवडमध्ये शरद पवारांची होणार भव्य सभा, करणार मोठं शक्तिप्रदर्शन!

गेल्या एक वर्षांपासून आई एकविरा देवीच्या विश्वस्तपदाची निवडणूक रखडली होती. अखेर ती निवडणूक आज पार पडली. या निवडणुकीत सात सदस्यांपैकी पाच सदस्य हे शेळके यांचे समर्थक होते. त्यांनी बाळ्या मामा म्हात्रे यांना मतदान केलं. त्यांनी पक्ष पाहिला नाही. बाळ्या मामा यांना एकविरा आई ची सेवा करायची असल्याने त्यांना संधी दिल्याचे आमदार सुनील शेळके यांनी म्हटलं आहे. दिलेला शब्द पाळला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळं राजकारणापलीकडे जाऊन शेळके यांनी बाळ्या मामा सोबतची मैत्री जपली आहे. त्यामुळं राजकारणात कुणी- कुणाचा शत्रू नसतो पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In lonavala mp balyamama mhatre becomes trustee of aai ekvira devi trust with the help of ncp ajit pawar faction mla kjp 91 css
Show comments