पुणे : राज्यात यंदा स्वाइन फ्लूमुळे ५७ जणांचा मृत्यू झाला आहे. या वर्षी जानेवारी ते १८ नोव्हेंबर या कालावधीत राज्यात स्वाइन फ्लूचे २१ लाख ३३ हजारांहून अधिक संशयित रुग्ण आढळले आहेत. सध्या २५ रुग्ण रुग्णालयात दाखल असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

सार्वजनिक आरोग्य विभागाने स्वाइन फ्लूबाबतचा अहवाल जाहीर केला आहे. या अहवालानुसार, राज्यात यंदा १८ नोव्हेंबरपर्यंत एकूण २१ लाख ३३ हजार ६९५ संशयित रुग्ण आढळून आले आहेत.

हेही वाचा : पुणे: वीज देयकावरील नावात बदल करण्यासाठी ८०० रुपयांची लाच, महावितरणमधील कर्मचाऱ्याला पकडले

यातील ५ हजार ७५१ रुग्णांना ऑसेलटॅमीवीर हे औषध देण्यात आले आहे. स्वाइन फ्लूचा उपप्रकार एच१एन१ आणि एच३एन२ या दोन्ही विषाणूंची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या २ हजार ३२४ आहे. राज्यात एच१एन१मुळे ५६ जणांचा मृत्यू झाला असून, एच३एन२मुळे एकाचा मृत्यू झाला आहे.