पुणे : राज्यातील सर्व पारंपरिक विद्यापीठे आणि संस्थांना आर्थिकदृष्ट्या सक्षमता वाढण्याच्या दृष्टीने पहिल्यांदाच अभ्यास करण्यात येणार आहे. त्यासाठी पुण्यातील गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्थेची नेमणूक करण्यात आली असून, या अभ्यासातून विद्यापीठे आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी पर्यायी आर्थिक प्रारूप विकसित करण्याचे उद्दिष्ट आहे. सध्या राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू आहे. या धोरणाअंतर्गत अनेक महत्त्वाचे बदल होणार आहेत. त्यामुळे या धोरणाच्या अनुषंगाने विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या आर्थिक स्थितीचा अभ्यास करून विद्यापीठे आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासंदर्भात जून २०२२ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे तत्कालीन प्र-कुलगुरू यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीने सरकारला अहवाल सादर केला. त्यानंतर अधिक अभ्यास करण्यासाठी गोखले संस्थेची निवड झाली आहे. ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये गोखले संस्थेचे कुलगुरू डॉ. अजित रानडे, डॉ. विशाल गायकवाड, प्रा. अभय पेठे, विश्वनाथ गिरिराज यांचा समावेश आहे. या अभ्यासासाठी १८ लाख रुपयांचा निधी गोखले संस्थेला देण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा