पुणे : अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्‍त्र, नियोजन, कृषी तंत्रज्ञान या अभ्यासक्रमाच्‍या प्रथम वर्ष प्रवेशासाठीची सामायिक प्रवेश परीक्षा (एमएचटी-सीईटी) १६ ते ३० एप्रिल या कालीवधीत राज्य आणि परराज्यांतील परीक्षा केंदावर घेण्यात येणार आहे. या सीईटीच्या ऑनलाइन अर्जांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्‍य सीईटी सेलतर्फे व्‍यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी संबंधित सीईटीसाठी ऑनलाइन नोंदणी, अर्ज भरणे आवश्यक आहे. सीईटी सेलकडून नियमित शुल्‍कासह अर्ज करण्यासाठी ८ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : समलैंगिक असताना लपवून विवाह; महिलेच्या तक्रारीनंतर पतीसह सासू-सासऱ्यांवर गुन्हा

मात्र शनिवारी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार विलंब शुल्‍कासह अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे. त्‍यानुसार १५ मार्चपर्यंत अर्ज करता येणार आहे. ऑनलाइन पद्धतीने शुल्‍क भरण्यासाठी १६ मार्च अंतिम मुदत आहे. अर्ज नोंदणीचे वेळापत्रक राज्‍य सीईटी सेलच्‍या संकेतस्‍थळावर उपलब्ध आहे. दरम्‍यान, एमबीए, एमसीए, बीएड, इंटिग्रेडेड बीएड, मास्‍टर ऑफ आर्किटेक्‍चर, मास्‍टर ऑफ हाॅटेल मॅनेजमेंट, केटरिंग टेक्‍नाॅलाॅजी, तीन वर्षीय विधी आणि बीपीएड या अभ्यासक्रमांच्या सीईटीचा सराव करता येणार आहे. त्याचा दुवा सीईटी सेलच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In maharashtra mht cet exam form online application date extended to 15th march 2024 pune print news ccp 14 css