पुणे : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात पुण्याची आगेकूच सुरूच असून, पुण्याने गेल्या पाच वर्षांत राज्यातील अव्वल स्थान कायम राखले आहे. देशातील सॉफ्टवेअर निर्यातीत राज्यात पुण्याचा वाटा सर्वाधिक आहे. देशपातळीवर बंगळुरू आणि हैदराबादनंतर पुणे तिसऱ्या स्थानी आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
देशातील सर्वांत पहिल्या सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्कमध्ये (एसटीपी) पुण्याचा समावेश होतो. पुण्यात हिंजवडीत १९९० मध्ये राजीव गांधी इन्फोटेक पार्क सुरू झाले. तेव्हापासून हे आयटी पार्क पुण्याच्या विकासाला गती देत आहे. देशाच्या निर्यातीतही पुण्याचे योगदान आयटी पार्कमुळे दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या तीन वर्षांत सॉफ्टवेअर निर्यातीत पुण्याने देशातील पहिल्या तीन शहरांमध्ये आपले स्थान कायम ठेवले आहे. याच वेळी पुण्याने राज्यातील अव्वल स्थानही कायम राखले आहे.
हेही वाचा : नवे वर्ष ‘एआय’चे; शिक्षण संस्थांना काय करावे लागणार?
केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत देशातील सॉफ्टवेअर निर्यातीची गेल्या पाच वर्षांतील आकडेवारी सादर केली. या आकडेवारीनुसार, गेल्या आर्थिक वर्षात (२०२३-२४) देशातील सॉफ्टवेअर निर्यातीत बंगळुरू ४ लाख ७ हजार ८८ कोटी रुपयांसह पहिल्या स्थानी आहे. हैदराबाद १ लाख २१ हजार ११५ कोटी रुपयांसह दुसऱ्या स्थानी, तर पुणे १ लाख ५ हजार ८१८ कोटी रुपयांसह तिसऱ्या स्थानी आहे. राज्याचा विचार करता सॉफ्टवेअर निर्यातीत पुणे अव्वल स्थानी आहे. गेल्या आर्थिक वर्षात (२०२३-२४ मध्ये) मुंबई ७६ हजार ५६४ कोटी रुपयांसह दुसऱ्या स्थानी, नागपूर ६४६ कोटींसह तिसऱ्या स्थानी, नाशिक ४९५ कोटींसह चौथ्या स्थानी, कोल्हापूर १८९ कोटींसह पाचव्या स्थानी आणि छत्रपती संभाजीनगर १३२ कोटी रुपयांसह सहाव्या स्थानी आहे.
‘सॉफ्टवेअर निर्यातीत पुणे जिल्हा देशात तिसऱ्या क्रमांकावर असून, उत्पादित वस्तू निर्यातीत देशात पाचव्या क्रमांकावर, तर अभियांत्रिकी वस्तू निर्यातीत देशात पहिल्या स्थानी आहे. माहिती तंत्रत्रान आणि उत्पादन क्षेत्रामुळे पुण्याला दुहेरी फायदा आहे. या दोन्ही क्षेत्रांत आपली कामगिरी चांगली आहे. हिंजवडी आयटी पार्कमधील पायाभूत सुविधांची मात्र समस्या असून, त्या सोडविण्यालाही गती देण्याची आवश्यकता आहे. आता कृत्रिम प्रज्ञा (एआय) आणि ड्रोन यांसारख्या नवतंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये आपण जास्त प्रगती करायला हवी. यासाठी सरकारने नवीन क्लस्टर निर्माण करावेत. यात एमसीसीआयए सरकारसोबत काम करेल,’ असे मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चरचे (एमसीसीआयए) महासंचालक प्रशांत गिरबने म्हणाले.
हेही वाचा : उच्च शिक्षणातील बदलांचे शाळेपासूनच मार्गदर्शन, आता ‘स्कूल कनेक्ट २.०’
पाच वर्षांत निर्यात दुप्पट
आर्थिक वर्ष – सॉफ्टवेअर निर्यात (कोटी रुपयांत)
२०१९-२० – ५० हजार १५७
२०२०-२१ – ५६ हजार ९३८
२०२१-२२ – ७० हजार ४८७
२०२२-२३ -९४ हजार १०६
२०२३-२४ – १ लाख ५ हजार ८१८
राज्यातील सॉफ्टवेअर निर्यात २०२३-२४
शहर – निर्यात (कोटी रुपयांत)
पुणे – १ लाख ५ हजार ८१८
मुंबई – ७६ हजार ५६४
नागपूर – ६४६
नाशिक – ४९५
कोल्हापूर – १८९
छत्रपती संभाजीनगर – १३२