पुण्यातील तळेगाव दाभाडे येथे रात्री साडेआठच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी तळेगाव दाभाडे येथे वेगवेगळ्या चार ठिकाणी हवेत गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच तळेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अद्याप हवेत गोळीबार करण्याचं कारण समजू शकलं नाही. दहशत पसरविण्यासाठी हा गोळीबार केल्याचं प्रथमदर्शी सांगण्यात येत आहे.
दोन दुचाकीवरून जाणाऱ्या अज्ञात व्यक्तींनी चार ठिकाणी हवेत गोळीबार केला. या घटनेमुळे तळेगाव दाभाडे येथे खळबळ उडाली आहे. हनुमान मंदिर आणि गजानन महाराज चौक या दोन ठिकाणांसह इतर ठिकाणी हवेत गोळीबार करण्यात आला आहे. गोळीबार करताच अज्ञात व्यक्ती हे दुचाकीवरून पसार झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच तळेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अद्याप हवेत गोळीबार करण्याचं कारण समोर आलेलं नाही. याबाबत तळेगाव पोलीस अधिक तपास करत असून याचे धागेद्वारे कोणाशी जोडलेले आहेत का? याचा शोध घेत आहेत.