पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघात २५ लाख ९ हजार ४६१ मतदार असून, दोन हजार ५५६ मतदान केंद्रे आहेत. त्यापैकी १४ मतदान केंद्र हे संवेदनशील आहेत. सर्वाधिक सहा संवेदनशील मतदान केंद्र पिंपरी विधानसभेतील आहेत. संवेदनशील केंद्रांवर निवडणूक विभागासह पोलीस यंत्रणेचे विशेष लक्ष असणार आहे. त्यादृष्टीने उपाययोजना करण्यात येणार आहेत.

मावळ लोकसभेतील पनवेल विधानसभा मतदारसंघात ५३८ पैकी तीन मतदान केंद्र हे संवेदनशील आहेत. कर्जत मतदारसंघात ३३९ आणि उरण मतदारसंघात ३४० मतदान केंद्र आहेत. त्या दोन्ही मतदारसंघात एकही केंद्र संवेदनशील नाही. मावळ विधानसभा मतदारसंघात ३९० पैकी केवळ एक केंद्र संवेदनशील आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ५४९ मतदान केंद्र आहेत. त्यापैकी चार केंद्र हे संवेदनशील आहेत. तर, पिंपरी विधानसभेत ४०० मतदान केंद्र आहेत. त्यापैकी सर्वाधिक सहा मतदान केंद्र हे संवेदनशील आहेत. संवेनदशील मतदान केंद्रांवर विशेष लक्ष दिले जाते. त्या केंद्रावर स्वतंत्र निरीक्षक नेमला जातो. त्या केंद्रावरील मतदानावर ‘सीसीटीव्ही’ कॅमरे लावून ऑनलाइन प्रक्षेपण केले जाते. तसेच, एक सूक्ष्म निरीक्षक, केंद्रीय पोलीस दलातील एक कर्मचारी तैनात केला जातो.

Congress List for delhi assembly Election
Delhi Election : आता दिल्ली विधानसभेची धूम! काँग्रेसने जाहीर केली २१ उमेदवारांची यादी, अरविंद केजरीवालांसमोर तगडा उमेदवार!
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Rahul Gandhi And Arvind Kejriwal.
Delhi Election 2025 : काँग्रेसला हवी ‘आप’ची साथ, ‘हात’ मिळवण्यास केजरीवालांचा नकार
देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्रीपदी निवड करताना पडद्यामागे काय घडलं? बावनकुळे म्हणाले... (फोटो सौजन्य लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्रीपदी निवड करताना पडद्यामागे काय घडलं?
one nation one election
मोठी बातमी! केंद्रीय मंत्रिमंडळाची ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकाला मंजुरी
Ravindra Waikar And Amol Kirtikar
Ravindra Waikar : रवींद्र वायकरांची खासदारकी जाणार की राहणार? मुंबई उच्च न्यायालयाने राखून ठेवला निर्णय
Mahavikas Aghadi News
विरोधी पक्षनेते पदावरून महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच?
kumar ashirwad on Markadwad
“…तर भारतात बांगलादेशसारखी स्थिती झाली असती”, मारकडवाडीबाबत जिल्हाधिकाऱ्यांचं वक्तव्य

हेही वाचा…गोष्ट असामान्यांची Video: इन्फोसिसमध्ये ऑफिस बाॅय ते दोन स्टार्टअप्सचा संस्थापक – दादासाहेब भगत

संवेदनशील मतदान केंद्र ठरविण्याची पद्धत

ज्या मतदान केंद्रातील एखाद्या घटनेमुळे पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. त्यात मतदान केंद्र बळकावणे, बोगस मतदानाचे प्रमाण अधिक असणे, दादागिरी करणे, भांडणे होणे, शिवीगाळ करणे आदी प्रकार होणे. केंद्रावर एकाच उमेदवाराला ७५ टक्के मतदान झाले असल्यास, झालेल्या मतदानांपैकी ९० टक्के मतदान एकाच उमेदवाराला झाले असल्यास तसेच एका कुटुंबातील सदस्यांची नावे मतदार यादीत सलग एकाच मतदान केंद्रावर नसणे अशा मतदान केंद्रांना संवेदनशील केंद्र म्हणून घोषित केले जाते.

हेही वाचा…धक्कादायक : खाऊच्या आमिषाने चार वर्षांच्या बालिकेवर अत्याचार

निवडणूक आयोगाच्या निकषानुसार संवेदनशील मतदान केंद्रांवर उपाययोजना करून अंमलबजावणी केली जाईल. त्यानुसार १४ मतदान केंद्राचे ऑनलाइन प्रक्षेपण, एक सूक्ष्म निरीक्षक, एक अतिरिक्त पोलीस तैनात केला जाणार आहे, असे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सांगितले.

Story img Loader