पिंपरी -चिंचवड : मावळ लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार श्रीरंग बारणे आणि शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्यात चांगलीच जुंपली आहे. दोन्ही उमेदवारांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. नुकतेच श्रीरंग बारणे यांनी संजोग वाघेरे यांच्यावर मी बोलणार नाही. त्यांचा मतदारसंघात थांग पत्ता नाही. त्यांच्यावर काय बोलू असं म्हणत टीका केली होती. यावर संजोग वाघेरे यांनी पलटवार करत सत्तेसाठी पक्ष बदलणाऱ्यांनी बोलू नये, असा टोला लगावला आहे. संजोग वाघेरे पिंपरीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा :मावळमध्ये प्रचाराचा नारळ फुटला; ठाकरे गटाचे संजोग वाघेरे यांच्याकडून प्रचाराला सुरू

Kangana Ranaut criticism that Priyanka Gandhi has no respect for democracy
प्रियंका गांधीना लोकशाहीचा आदर नाही,कंगना रानौतची टीका..
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Video Story Of Ravindra Dhangekar And Devendra Fadnavis.
Ravindra Dhangekar: “निवडणूक हरत असल्याचे लक्षात येताच…” फडणवीसांच्या ‘ॲक्सिडेंटल आमदार’ टीकेला धंगेकरांचे प्रत्युत्तर; पाहा व्हिडिओ
nana patole replied to devendra fadnavis
“आरएसएससुद्धा धार्मिक संघटना, मग त्यांनी…”; देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला नाना पटोले यांचे प्रत्युत्तर!
Oppositions stole promises along with schemes criticized Eknath Shinde in Ambernath
“विरोधकांनी योजनांसह वचननामाही चोरला…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अंबरनाथमध्ये टीका
Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Ajit Pawar scolded Ravi Rana
“महायुतीत मिठाचा खडा टाकू नका”, मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री अजित पवारांनी रवी राणांना खडसावले
What Vikrant Messy Said About Muslims
Vikrant Massey : “देशातल्या मुस्लिमांना धोका नाही, कुणीही..”, विक्रांत मेस्सीचं वक्तव्य; टीकेचा भडीमार

ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरे म्हणाले, श्रीरंग बारणे हे विद्यमान खासदार आहेत. ते जर मतदारसंघातील नागरिकांना ओळखत नसतील तर ही शोकांतिका आहे. त्यांना समजलं पाहिजे की ते कुणाबद्दल बोलत आहेत. कारण मी त्यांच्या मतदारसंघात राहतो. माझं मूळ गाव, जन्मभूमी आणि कर्मभूमी ही पिंपरी गाव आहे. ते चुकीचं बोलत आहेत, असं म्हणत संजोग वाघेरे यांनी बारणे यांना खोचक टोला लगावला. पुढे ते म्हणाले, ते कुठल्या पक्षातून कुठल्या पक्षात आले आहेत, हे सर्वांना माहीत आहे. त्यांनी सत्तेसाठी पक्ष सोडला. आम्ही तत्वांसाठी पक्ष सोडला. आम्ही सत्तेसाठी दुसऱ्या पक्षात गेलो नाहीत.

हेही वाचा : पुणे : मोदींचा मेट्रोला हिरवा झेंडा! पिंपरी-चिंचवड ते निगडी मार्गाचे भूमिपूजन; रुबी हॉल ते रामवाडी सेवा सुरू

श्रीरंग बारणे नेमकं काय म्हणाले होते?

मावळचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी नुकतीच संजोग वाघेरे यांच्यावर टीका करत त्यांच्यावर अधिक बोलण्यास नकार दिला होता. ‘ज्या व्यक्तीचा मावळ मतदारसंघात थांग पत्ता नाही अशा व्यक्तींवर मी बोलणार नाही. पक्षनिष्ठेबाबत त्यांनी मला सांगू नये’,असे बारणे यांनी म्हटले होते.