पिंपरी- चिंचवड: महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी माझ्यासमोर उमेदवार कोण आहे हे मला माहीत नाही, असं विधान केलं होतं. याच विधानावरून आता महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी बारणे यांना खोचक टोला लगावला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बारणेंसाठी चार तास रोड-शो घ्यावा लागला. उपमुख्यमंत्री, पंतप्रधान यांना देखील यावं लागलं. यावरून बारणे यांना समोरील उमेदवार कोण आहे? नक्कीच कळलं असेल. आता त्यांना लक्षात आलं असेल, असा खोचक टोला संजोग वाघेरे यांनी श्रीरंग बारणे यांना पत्रकार परिषदेत लगावला आहे.

हेही वाचा : पाच पक्ष बदलणारे अमोल कोल्हे हे महागद्दार – शिवाजी आढळराव पाटील

Neelam Kothari And Mahesh Thakur
“मी तिच्या अंगावर पडलो अन् नीलमने…”, अभिनेत्याने सांगितला ‘हम साथ साथ है’च्या शूटिंगचा किस्सा; म्हणाला, “त्यानंतर सलमानने…”
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
telangana news
भाजपाचे नेते काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचे चीअरलीडर्स आहेत; केटी रामाराव यांचा आरोप!
ravi rana replied to ajit pawar
“…तेव्हा ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ आठवली नाही का? आता परिणाम भोगा”; रवी राणांचं अजित पवारांना प्रत्युत्तर!
Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Ajit Pawar scolded Ravi Rana
“महायुतीत मिठाचा खडा टाकू नका”, मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री अजित पवारांनी रवी राणांना खडसावले
ajay devgan
“तो कारमध्ये एक हॉकी स्टिक…”, रोहित शेट्टीने अजय देवगणबाबत केला खुलासा; अभिनेता म्हणाला, “आता मी…”
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!

वाघेरे म्हणाले, मुख्यमंत्री यांनी श्रीरंग बारणेंसाठी चार तास रोड- शो घेतला. आता तरी बारणे मला ओळखत असतील. मला ते ओळखत नव्हते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांनी सभा घेतल्या यावरून त्यांना कळलं असेल समोरील उमेदवार कोण आहे? पुढे ते म्हणाले, मावळ मतदारसंघात विकास झालेला नाही. विकासाच्या नावाखाली मतं घेतली. पक्ष सोडून गद्दारी केली. विकास शोधावा लागतोय. कामगार, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत तसेच आहेत. पुढे ते म्हणाले, स्मार्ट सिटी आणि टीडीआर घोटाळा बद्दल ते आक्रमक होते, काहीतरी निघेल अस वाटलं. पण तो विषय आहे. तसाच राहिला आहे. पुढे ते म्हणाले, मी गद्दारी केली नाही. पक्ष फोडला नाही. संविधानाने दिलेल्या अधिकारातून पक्ष सोडला आहे. ज्या पक्षाने दोन वेळेस खासदार केलं त्याला सोडून जाणं याला गद्दारी म्हणतात, असा टोला देखील संजोग वाघेरे यांनी श्रीरंग बारणे यांना लगावला आहे.