पिंपरी : राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाने आमदार सुनील शेळके यांना उमेदवारी दिल्यानंतर बापू भेगडे यांनी अपक्ष लढण्याचे जाहीर केल्यानंतर आता भाजपची भूमिका समोर आली आहे. भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडेंसह मावळमधील सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. बंडखोरी केलेल्या बापू भेगडे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
बाळा भेगडे म्हणाले, भाजप कार्यकर्त्यांची अवहेलना केली, ते आम्हाला राजकारणातून संपवू शकत नाही. छातीवर दगड ठेवून निर्णय घेत आहे. जनसंघापासून आम्ही भाजपचे काम करताे. गेल्या पाच वर्षांपासून कार्यकर्त्यांला राजकारणातून संपून टाकण्याची भाषा केली. खच्चीकरण केले. राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून शेळके यांची उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे पक्षाच्या पदाचा राजीनामा देऊन आम्ही बापू भेगडे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा : संभाजी ब्रिगेड ५० जागा लढविणार
आम्ही निवडणूक जिंकणारच आहाेत. पक्षाने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एवढा मोठा केले. तीनदा उमेदवारी दिली. आमदार, मंत्री केले. पण, मावळमध्ये पक्ष कार्यकर्ता वाचविण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची माफी मागून निर्णय घेत आहे.
© The Indian Express (P) Ltd