पुणे: मध्य रेल्वेने ऑक्टोबर महिन्यात ७३.५ लाख टन मालाची वाहतूक केली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत त्यात २३ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. यंदा ऑक्टोबरमध्ये मध्य रेल्वेने मालवाहतुकीतून ८०२ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मध्य रेल्वेने ऑक्टोबर महिन्यात ७३.५ लाख टन मालवाहतूक केली. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात मालवाहतूक ५९.७ लाख टन होती. त्यात तुलनेत आता २३.०१ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. आतापर्यंतच्या ऑक्टोबर महिन्यातील ही सर्वाधिक मालवाहतूक ठरली आहे.

हेही वाचा… पुणे विद्यापीठातील राजकीय राड्यानंतर आता सलोखा; पोलीस आयुक्त, कुलगुरूंच्या उपस्थितीत संघटनांची शनिवारी बैठक

मध्य रेल्वेने एप्रिल-ऑक्टोबर या कालावधीत ४.९० कोटी टन मालवाहतूक केली आहे. मागील वर्षी याच कालावधीत ते ४.३९ कोटी टन होते. त्यात आता ११.५० टक्के वाढ नोंदविण्यात आली. याचबरोबर ऑक्टोबरमध्ये मध्य रेल्वेने ८०२ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये ते ६३६ कोटी रुपये होते. यंदा त्यात २६.१० टक्के वाढ झाली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In october central railway has earned rs 802 crore from freight pune print news stj 05 dvr
Show comments