लोणावळा : मावळ तालुक्यातील पवना धरणात बुधवारी सायंकाळी पाण्यामध्ये बोट उलटून दोन जण बुडून मृत्यूमुखी पडल्याची दुर्दैवी घटना घडली होती. या प्रकरणी बंगला मालक आणि बोट मालकवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुर्घटनेत मयत झालेला तुषार अहिरे याच्या नातेवाईकांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद दिली असल्याची माहिती लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मूळचे भुसावळ येथील असलेले तुषार अहिरे आणि मयूर भारसाके हे मित्रांसोबत मावळ तालुक्यातील पवना धरण परिसरामध्ये चार डिसेंबर रोजी फिरायला आले होते. पवना धरणाच्या बॅकवॉटर परिसरात असलेल्या लेक इस्केप व्हिला या बंगल्यात ते थांबले होते. सदरचा बंगला हा पवना जलाशयाच्या बॅक वॉटर ला लागूनच आहे. तेथूनच थेट धरणामध्ये उतरण्यासाठी रस्ता आहे.

हेही वाचा…महापालिकेने वाजविला बँड अन् तिजोरीत आली इतकी रक्कम !

जलाशयामध्ये सुमती व्हिवा यांची एक बोट देखील होती. तुषार अहिरे, मयूर भारसाके त्यांचा एक मित्र बोट घेऊन पाण्यामध्ये गेले होते. बोट पलटी उलटून तुषार आणि मयूर हे पाण्यात पडले. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्या दोघांचा देखील पाण्यात बुडून दुर्दैवी असे मृत्यू झाला होता. नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pavana dam in maval taluka on wednesday evening when two persons drowned after their boat overturned in water pune print news rbk 25 sud 02