पिंपरी- चिंचवड : चिंचवड विधानसभेच्या आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या मायेचा प्रत्यय आज पिंपरी चिंचवडकरांना बघायला मिळाला. अश्विनी लक्ष्मण जगताप यांना माई या नावाने पिंपळे गुरव परिसरात ओळखले जाते. त्याच आमदार माईंनी अपघातग्रस्त कुटुंबाला मायेचा हाथ पुढे करत स्वतः च्या गाडीतून रुग्णालयात नेले. आमदार जगताप यांच्या मदतीमुळे त्यांच्यातील माणुसकीचे आज दर्शन घडले. आज त्या पिंपळे सौदागर रस्त्यावरून जात असताना महिला आणि तिच्या दोन लहान मुलांचा अपघात झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : वर्षभरात पुणे जिल्ह्यात १४ कोटींचे अमली पदार्थ जप्त, पोलिसांच्या कारवाईत ५०४ आरोपी गजाआड

तात्काळ त्यांनी गाडी थांबून त्यांची विचारपूस केली. लहानग्याला पाणी देखील पिण्यास विचारले. या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नावाप्रमाणेच आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप या त्यांच्या मदतीला धावून गेल्या. तातडीने त्यांना स्वतःच्या गाडीतून रुग्णालयात नेण्याची व्यवस्था केली. शहरामध्ये अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होते आणि याच वाहतूक कोंडीचा फटका अपघातग्रस्त महिला आणि मुलांना बसला. ऐनवेळी आमदार अश्विनी जगताप या मदतीला धावून आल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pimple saudagar mla ashwini jagtap helped accident victim woman and her childrens kjp 91 css
Show comments