पिंपरी : बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड बनवून देशात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या तीन बांगलादेशींना राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या पुणे विभागाने मोशीतील बो-हाडेवाडी येथे सोमवारी रात्री अटक केली. त्यांच्याकडून बांगलादेशी चलन, भारतीय आधारकार्ड, पॅनकार्ड जप्त केले. सुकांथा बागची (वय २१), नयन बागची (वय २२) आणि सम्राट बाला (वय २२, तिघे मूळ रा. ग्राम बहादुरपूर, दतोकन्दवा, जिल्हा मदारीपूर, बांगलादेश) असे अटक केलेल्या बांगलादेशींची नावे आहेत. तिघेही एकमेकांचे नातेवाईक आहेत. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय महादेव दराडे यांनी फिर्याद दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोशीतील बो-हाडेवाडी येथे सह्याद्री या गृहप्रकल्पाचे काम सुरु आहे. या गृहप्रकल्पावर बिहार, उत्तरप्रदेशमधील मजूर काम करतात. त्यांच्यासोबत तीन बांगलादेशीही वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली होती. त्याबाबत मजुरांकडे विचारणा केली असता तिघांना हिंदी भाषा येत नव्हती. चौकशी केल्यानंतर तिघे मूळ बांगलादेशी असल्याचे समोर आले.

हेही वाचा : राज्यातील शाळा आता दत्तक घेता येणार, काय आहे योजना?

तिघेही घुसखोरी करुन भारतात आले आहेत. त्यांनी कोलकत्ता येथून नऊ महिन्यांपूर्वी बनावट आधार कार्ड, पॅनकार्ड बनविले होते. तिघांना अटक केली आहे. सुकांथा, नयन बागची हे २३ जुलै २०२३ रोजी तर सम्राट हा ६ ऑगस्ट रोजी मोशीतील लेबर कॅम्प येथे वास्तव्यास आले होते. तिघेही मजूर म्हणून काम करत होते. त्यांच्याकडून भारतीय आधारकार्ड, पॅनकार्ड, बांगलादेशी चलन, मोबाइल संच जप्त करण्यात आले आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pimpri 3 bangladeshi nationals arrested by pune ats for illegal stay in india pune print news ggy 03 css