पुणे: शिरूर लोकसभा महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांनी नुकतंच माझी ही शेवटची निवडणूक असल्याचं भावनिक आवाहन मतदारांना केलं होतं. यावरून महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार अमोल कोल्हे यांनी शेलक्या शब्दात शिवाजी आढळराव पाटील यांच्यावर टीका केली आहे. शिवाजी आढळराव पाटील यांच वक्तव्य म्हणजे निव्वळ मनोरंजक विधान आहे. कधीतरी मी पणा सोडून देशाचा विचार करा. ते उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी पराभूत झाले आहेत, असा निशाणा अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटील यांच्यावर साधला आहे. अमोल कोल्हे हे पिंपरी- चिंचवडमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
हेही वाचा : ‘आयसर’च्या प्रवेश प्रक्रियेत बदल… आता कशी होणार प्रवेश परीक्षा?
महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातील तळवडे भागात मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. घरोघरी जाऊन प्रचार केला. अमोल कोल्हे यांनी विरोधक शिवाजी आढळराव पाटील यांच्यावर निशाणा साधला. आढळराव यांनी नुकतंच लोकसभा निवडणूक ही माझी शेवटची असल्याचं भावनिक आवाहन मतदारांना केलं होतं. या प्रश्नावर बोलताना कोल्हे यांनी शिवाजी आढळराव पाटील यांच्यावर टोलेबाजी केली. ते म्हणाले, स्वतःचं मनोधैर्य वाढवण्यासाठी शिवाजी आढळराव पाटील दररोज एक मनोरंजक विधान करत आहेत. आढळराव पाटलांनी मी पणा सोडून कधीतरी देशाचा विचार करायला हवा. असा टोला त्यांनी लगावला आहे. पुढे ते म्हणाले, मतदारांना अशा प्रकारे भावनिक आवाहन करत असतील तर याचा अर्थ उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वीच ते पराभूत झाले आहेत असा होतो. शिवाजी आढळराव पाटील यांनी गेल्या पंधरा वर्षात एकही मोठा प्रोजेक्ट शिरूर लोकसभा मतदारसंघात आणलेला नाही. अस ही अमोल कोल्हे म्हणाले आहेत. याला शिवाजी आढळराव पाटील काय प्रतिउत्तर देणार हे पाहावं लागेल.