पिंपरी- चिंचवडमध्ये तीन वर्षीय चिमुरड्याला इतर अल्पवयीन मुलांनी विहिरीत ढकलून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अग्निशमन दल, चिखली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून चिमुरड्याला विहिरीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. या घटनेत चिमुरड्याचा मृत्यू झाला असण्याची शक्यता पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांनी व्यक्त केली आहे. वसीम नाज्जीमुद्दीन खान असं तीन वर्षीय चिमुरड्याचं नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घराजवळ असलेल्या विहिरी जवळ तीन ते चार मुलं खेळत होती. त्यापैकी, काही मुलांनी खेळत असताना यातील एका मुलाला थेट विहिरीत ढकलून दिले. तीन वर्षीय वसीम हा विहिरीत पडला असल्याची माहिती इतर मुलांनी त्यांच्या कुटुंबीयांना दिली. मग, कुटुंबीयांनी चिखली पोलिसांना माहिती दिली.

vasai municipal schools
“बजेट वाढवा पण शाळा सुरू करा”, स्नेहा दुबेंकडून पालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
How to get rid of mobile addiction from kids parents did this trick viral video
मुलाने चक्क मोबाइल सोडला आणि अभ्यासाला बसला! पालकांनी केलेला ‘हा’ प्रयोग पाहून तुम्हीही व्हाल चकित, पाहा VIDEO
akshay kumar
‘हाऊसफुल ५’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अक्षय कुमारच्या डोळ्याला दुखापत
Sexual assault on three year old girl in Ghatanji Yavatmal crime news
यवतमाळ: संतापजनक! तीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार
mumbai best bus crash driver gets police remand till dec 21
कुर्ला अपघातःचालकाला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यांत अटक; २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
young woman abandoned her newborn near Vanzra Layout Nagpur
अनैतिक संबंधातून जन्मलेल्या बाळाला रस्त्यावर फेकले
Pimpri , Chikhli, scrap dealers in Chikhli,
पिंपरी : चिखलीतील अनधिकृत भंगार व्यावसायिकांवर कठोर कारवाई करा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

हेही वाचा : पिंपरीत ‘चौबे पॅटर्न’, पोलीस आयुक्तांनी ३९ आरोपींवर लावला मोक्का; आतापर्यंत एकूण ३९६ आरोपींवर कारवाई

चिखली पोलीस तसेच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून विहिरीतून मुलाला बाहेर काढण्याचे शर्तीचे प्रयत्न करत आहेत. मात्र, या घटनेत चिमुरड्याचा मृत्यू झाला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. घटनास्थळी चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर, गुन्हे पोलीस निरीक्षक राजेंद्र बर्गे यासह इतर पोलीस कर्मचारी उपस्थित आहेत.

Story img Loader