पिंपरी- चिंचवड : पिंपरी- चिंचवड हा अजित पवारांचा बालेकिल्ला आहे, असं नेहमीच म्हटलं जातं. मात्र याच बालेकिल्ल्यातून आता अजित पवारांना एक- एक धक्का बसत असल्याचं समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी शहराध्यक्ष तथा माजी महापौर संजोग वाघेरे हे शिवसेना ठाकरे गटाच्या वाटेवर आहेत. त्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि तसा इशारा दिला आहे. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया समोर आली असून महाविकास आघाडीला उमेदवार मिळत नसल्याने ते अशा प्रकारे वेगवेगळ्या पक्षातील उमेदवार घेत असल्याचा टोला त्यांनी उद्धव ठाकरे गटाला लगावला आहे. याबाबत मी संजोग वाघेरे सोबत लवकर चर्चा करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कुठल्या पक्षात जायचे आणि कुठल्या पक्षात थांबायचे यासाठी व्यक्ती आणि मत स्वातंत्र्य असल्याचे देखील अजित पवारांनी म्हटले आहे. ते सोमवारी पिंपरी- चिंचवडमध्ये बोलत होते.

हेही वाचा : पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर ठाकरे गटात? संजोग वाघेरे, उद्धव ठाकरे भेटीमुळे अजित पवारांना धक्का, उपमुख्यमंत्री म्हणाले…

police issue lookout notice against sindhudurg shivaji statue artist jaydeep apte
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचं प्रकरण; शिल्पकार जयदीप आपटे विरोधात लुकआऊट नोटीस जारी
21st September Rashi Bhavishya & Marathi Panchang
२१ सप्टेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थीला बाप्पा करणार ‘या’…
ajit pawar visit at rajkot fort malvan
Ajit Pawar : “शिवरायांच्या नावाला साजेसं स्मारक उभारणार”; राजकोट किल्ल्याच्या पाहणीनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया; ठाकरे-राणे वादावर म्हणाले…
bjp bihar pattern in Maharashtra
‘बिहार पॅटर्न’ला बगल? संघ सक्रिय झाल्यामुळे भाजप श्रेष्ठींच्या मनसुब्यांवर प्रश्नचिन्ह
sanjay raut criticized devendra fadnavis
Sanjay Raut : “हा महाराष्ट्राच्या गृहखात्यावर थुंकण्याचा प्रकार”; राजकोट किल्ल्यावरील राड्यावरून संजय राऊतांचं टीकास्र; म्हणाले, “भाजपाच्या गुंडांनी काल…”
Ajit Pawar On Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse
Ajit Pawar : “राज्यातील १३ कोटी जनतेची माफी मागतो”, शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी अजित पवारांची प्रतिक्रिया
Sadashiv Sathe, Bhau Sathe, Chhatrapati Shivaji Maharaj, sculptures, standing statue of Chhatrapati Shivaji Maharaj with sword,
आरमार-द्रष्टे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या उभ्या, तलवारी पुतळ्याचे खरे संकल्पक भाऊ साठेच!
Bhagwan Rampure sculptor, Solapur,
सोलापूर : पुतळा उभारताना तांत्रिक गोष्टींकडे दुर्लक्ष झाल्याचा संशय, ज्येष्ठ शिल्पकार भगवान रामपुरे यांचे ताशेरे

अजित पवार म्हणाले, राजकारणात कोण कोणाच्या भेटी घेतो हे राजकारणात पहिल्यापासूनच आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या पक्षातून उमेदवारी कोणाला मिळेल याची चाचपणी एखाद्याने केली असेल. काही जणांना खासदार व्हायचं आहे. या पक्षात तिकीट नाही मिळालं तर त्या पक्षात तिकीट मिळेल का? या हेतूने काही जण गेले असतील. माझं त्यांच्यासोबत काही संभाषण झालेलं नाही. संजोग वाघेरे आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो मी एकत्र बघितलेला आहे. संजोग वाघेरे सोबत याबाबत मी चर्चा करणार आहे. प्रत्येकाला व्यक्ती आणि मत स्वातंत्र्य आहे. महाविकास आघाडीला उमेदवार मिळत नसल्याने ते आता अशा प्रकारे वेगवेगळ्या पक्षातील उमेदवार घेत आहेत. असा टोला अजित पवारांनी ठाकरे गटाला लगावला आहे.