पिंपरी-चिंचवड : शहरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून एक स्नेह मेळावा आणि दिवाळी फराळाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. या कार्यक्रमामध्ये पिंपरी- चिंचवडमधील स्थानिक विरोधक आणि सत्ताधारी नेत्यांना एकत्र बघण्याची संधी मिळते. एकमेकांचे हेवेदावे, कुरघोडीचे राजकारण बाजूला ठेवून राजकीय नेत्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी एकत्रितपणे दिवाळी फराळाचा मनमुराद आनंद घेतला. दिशा सोशल फाउंडेशनच्या वतीने यंदा आठव्या वर्षी दिवाळी फराळाचे आयोजन करण्यात आले. यावेळी कलाक्षेत्रातील सिनेअभिनेते प्रवीण तरडे यांच्यासह देवदत्त नागे यांची उपस्थिती होती.

पिंपरी- चिंचवड शहर हे औद्योगिक नगरी म्हणून ओळखले जाते. शहरातील राजकारण हे देखील तितकंच महत्त्वाचं मानलं जातं. गेल्या काही वर्षांपासून सत्ताकारण बदललं असून शहरांमध्ये भाजपाची सत्ता होती. विरोधक म्हणून राष्ट्रवादीने आपली चोख भूमिका बजावली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. शहरामध्ये अजित पवार गट, शरद पवार गट, शिवसेना, शिवसेना उद्धव ठाकरे गट, काँग्रेस असं राजकारण बघायला मिळतं. या गटांमध्ये एकमेकांविरोधात कुरघोड्या आणि राजकारण करण्याचं काम नेहमीच सुरू असतं. परंतु, हे सर्व विसरून दिशा सोशल फाउंडेशनने आयोजित केलेल्या दिवाळी फराळाच्या कार्यक्रमासाठी सर्व स्थानिक नेत्यांसह आमदार, खासदार यांनी उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमासाठी विशेष वेळ काढून अनेक नेत्यांनी हजेरी लावत जवळपास तीन तास सर्व विरोधक आणि सत्ताधारी गप्पा-गोष्टीत रंगले होते. राजकीय विरहित म्हणून दिशा सोशल फाउंडेशनच्या या कार्यक्रमाकडे बघितलं जातं. हे त्यांचं आठव वर्ष होतं.

leaders abusive language in politics politicians use foul languages politicians use hate speech
नेत्यांच्या भाषेत ही सवंगता येते तरी कुठून?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
vip political leaders checking during the election campaign
बॅग तपासणीवरून नवे वादंग; नाहक त्रास देण्याचा प्रयत्न, महाविकास आघाडीचा आरोप, विरोधकांकडून केवळ राजकारण : महायुतीचे प्रत्युत्तर
traffic cleared due to police planning in Pune print news
पाेलिसांच्या नियोजनामुळे वाहतूक सुरळीत-पंतप्रधानांच्या सभेसाठी कडक बंदोबस्त
Roads Kharghar, Narendra Modi meeting,
पंतप्रधानांच्या सभेमुळे खारघरचे रस्ते चकाचक
Hadapsar, NCP, Hadapsar latest news,
हडपसरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वर्चस्वासाठीची लढाई
BJP leader former MP Navneet Ranas campaign vehicle get viral in Amravati
नवनीत राणा म्‍हणतात, “…त्या नेत्यांचा हिशेब करा”, प्रचार वाहनाची जोरदार चर्चा

हेही वाचा : फटाक्यांमुळे पुणे, पिंपरी चिंचवडची हवा ‘अतिवाईट’ श्रेणीमध्ये

या कार्यक्रमांमध्ये खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार अमर साबळे, माजी मंत्री बाळा भेगडे, आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार दीपक पायगुडे, अभिनेते प्रवीण तरडे, देवदत्त नागे यासह राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप, काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, मनसेचे शहर अध्यक्ष सचिन चिखले, संजोग वाघेरे, राहुल कलाटे, सचिन साठे, विठ्ठल उर्फ नाना काटे, शत्रुघ्न काटे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांसह अनेक स्थानिक नेत्यांनी सहभाग घेतला.

हेही वाचा : VIDEO: फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये १८ ठिकाणी आगीच्या घटना; ११ घरांना आग

यावेळी प्रवीण तरडे म्हणाले, सार्वजनिक जीवनाच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांना एकाच व्यासपीठावर आणून सांस्कृतिक विचारांची दिवाळी साजरी करण्याचा हा अनोखा उपक्रम दिशा सोशल फाउंडेशन राबवत आहे मी या संस्थेचा एक भाग आहे याचा मला अभिमान वाटतो. तर देवदत्त नागे म्हणाले, दिवाळीचा सण हा प्रकाशाचा उत्सव आहे स्नेह आपुलकी आणि एकात्मता जपणारा दिवस आहे दिवाळी फराळाच्या निमित्ताने आपल्यातील स्नेह आणि आपुलकी अधिक वाढावी म्हणून अशा प्रकारचे कार्यक्रम प्रत्येक शहरात राबविले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर खासदार श्रीरंग बारणे, आमदार बनसोडे आणि भाजप शहराध्यक्ष शंकर जगटाव यांनी देखील या कार्यक्रमाचा तोंड भरून कौतुक केलं आणि अशाच प्रकारे राजकारण विरहित कार्यक्रम व्हायला पाहिजे असं प्रोत्साहन त्यांनी दिलं. या कार्यक्रमाचे आयोजन दिशा सोशल फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले असून अध्यक्ष जगन्नाथ उर्फ नाना शिवले, उपाध्यक्ष संतोष बाबर, कार्याध्यक्ष राजेंद्र करपे, सचिव संतोष निंबाळकर, खजिनदार नंदकुमार कांबळे, माजी अध्यक्ष गोरख भालेकर, माजी कार्याध्यक्ष सचिन साठे यांनी नियोजन केलं होतं.