पिंपरी- चिंचवडच्या सांगवी परिसरात अज्ञात व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. ही घटना रात्री दहाच्या सुमारास घडली असल्याची माहिती सांगवी पोलिसांनी दिली आहे. अद्याप या व्यक्तीची ओळख पटू शकलेली नाही. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा : पिंपरी : प्रवासी महिलेचा विनयभंग करणारा ओला कॅबचालक अखेर गजाआड
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगवी परिसरातील, शंकराच्या पुतळ्यापासून काही अंतरावर अज्ञात व्यक्तीची समोरून तोंडावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर सांगवीसह पिंपळे गुरव भागात खळबळ माजली आहे. अद्याप मृत्यू झालेल्या व्यक्तीची ओळख पटू शकलेली नाही. त्याचबरोबर गोळीबार करणारे व्यक्ती किती आणि कोण होते, हे देखील समजू शकलेलं नाही. घटनास्थळी सांगवी पोलीस दाखल झालेले असून अधिक तपास सुरू आहे.