पिंपरी-चिंचवडमध्ये गाडयांच्या तोडफोडीचे सत्र कायम आहे. शहराच्या पिंपळे गुरव भागात अज्ञात समाजकंटकांनी ओंकार कॉलनी मधील रस्त्याच्याकडेला पार्क केलेल्या रिक्षा आणि चारचाकी अशा सात ते आठ गाड्यांची तोडफोड केली. या प्रकरणी सांगवी पोलीस अधिक तपास करत आहेत.
सहा ते सात जणांच्या टोळक्याने हातात कोयते घेऊन धुडगूस घालत गाड्यांची तोडफोड केली. ही घटना मध्यरात्री घडली आहे. शेखर चांदणे यांच्या मालकीच्या तीन गाड्या फोडल्या आहेत. याप्रकरणी त्यांनी सांगवी पोलिसात फिर्याद दिली आहे.
ओंकार कॉलनी मध्ये गाडी घेऊन येत असताना चांदणे यांच्या गाडीवर अज्ञात टोळक्याने हल्ला केला यात गाडीच्या काचा फुटल्या आहेत. त्यांच्या पुतण्याला काच लागली असून तिघे जण सुदैवाने बचावले आहेत.