पिंपरी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीसाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विविध भरारी व स्थिर पथके यांच्या नेमणुका करण्यात आलेल्या आहेत. त्या अनुषंगाने निगडी येथे स्थिर सर्वेक्षण पथकाने केलेल्या तपासणीत एका कारमध्ये २९ लाख ५० हजाराची रोकड आढळून आली. ही रक्कम पुढील तपासासाठी उपायुक्त प्राप्तीकर मावळ विभाग यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आचारसंहिता अंमलबजावणीसाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विविध भरारी व स्थिर पथके यांच्या नेमणुका करण्यात आलेल्या आहेत. त्या अनुषंगाने दैंनदिन अहवाल मावळ लोकसभेचे निवडणुक निर्णय अधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाकडे सादर करण्यात येत असून निगडी व दापोडी या ठिकाणी स्थापित स्थिर सर्वेक्षण पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत. बुधवारी (. १ मे) सायंकाळी पाचच्या सुमारास निगडी येथील भक्ती-शक्ती चौकात स्थिर सर्वेक्षण पथकाने एका कारची तपासणी केली. कारमध्ये २९ लाख ५० हजाराची रोकड आढळून आली.

हेही वाचा : पिंपरी : नाट्य परिषद पिंपरी-चिंचवडच्या वतीने वासुदेव करतोय मतदान जनजागृती

अधिक चौकशी केली असता ही रक्कम दिपक रविंद्र वाणी यांची असल्याचे निष्पन्न झाले. या कारवाईचे चित्रीकरण व जप्ती पंचनामा तयार करण्यात आला असून संबंधितास जप्त केलेल्या रकमेची पोहोच देण्यात आली आहे. जप्त रक्कम व अनुषंगिक कागदपत्रे उपायुक्त प्राप्तीकर मावळ विभाग यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली आहे. या कारवाईची आयोगाकडील आज्ञावलीमध्ये नोंद करण्यात आलेली आहे. सविस्तर अहवाल पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी मावळ मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला असून पुढील तपास चालु आहे.

हेही वाचा : Shrirang Barne in Pimpari Chinchwad: माझ्यावर विश्वास टाकण्याचं काम करावं; बारणेंचं मतदारांना आवाहन

सव्वा महिन्यात सव्वाकोटीची रोकड जप्त

पिंपरी – चिंचवड पोलिसांना नाकाबंदी दरम्यान उर्से टोल नाका येथे एका कारमध्ये २६ मार्च रोजी ५० लाख रुपयांची रोकड पकडली. त्यानंतर एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या शेजारी एका आलिशान कारमध्ये १३ लाख ९० हजार रुपयांची रोकड मिळाली. २३ एप्रिल रोजी वाकड – हिंजवडी पुलाखाली नाकाबंदी दरम्यान निवडणूक विभाग आणि पिंपरी -चिंचवड पोलिसांच्या संयुक्त पथकाने २७ लाखांची रोकड पकडली. निगडी येथील कारवाईनंतर आतापर्यंत विविध पथकांनी पिंपरी – चिंचवड शहर परिसरात १ कोटी २० लाख ४० हजार रुपयांची रोकड पकडली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pimpri chinchwad cash of rupees 1 crore 20 lakh seized ahead of maval lok sabha election 2024 pune print news ggy 03 css