पिंपरी : गणपती विसर्जनासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. वाहतूक विभागाच्या भोसरी, तळेगाव, सांगवी, वाकड, चिंचवड, हिंजवडी, पिंपरी विभागात विसर्जनाच्या पाचव्या, सातव्या, दहाव्या दिवशी हे बदल असणार आहेत. पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी वाहतुकीत बदल केले आहेत. फुगेवाडी, दापोडी उड्डाणपूल मार्गे शितळादेवी चौकाकडून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून पुण्याकडे जाणारा मार्ग २३, २५ आणि २८ सप्टेंबर रोजी बंद असणार आहे.
नागरिकांना सांगवी, फुगेवाडी चौकातून जाता येईल. चाकणमधील एचपी चौकातून तळेगाव – चाकण रोडवर येणाऱ्या अवजड वाहनांना २५ सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजल्यापासून २६ सप्टेंबर सकाळी सहा वाजेपर्यंत प्रवेश बंदी असणार आहे. आंबेठाण चौक, वासुली, नवलाख उंबरे, भामचंद्र डोंगरमार्गे जाता येईल. मुंबईकडून येणाऱ्या अवजड वाहनांना वडगाव फाटा हद्दीतून चाकण, नाशिककडे जाण्यासाठी प्रवेश बंद आहे. त्यांना एमआयडीसी, नवलाख उंबरेमार्गे जाता येईल.
हेही वाचा : पिंपरी-चिंचवडमध्ये पवार बंधूंमध्ये राजकीय संघर्ष?
सांगवीतील कृष्णा चौकाकडून फेमस चौकाकडे जाणारा मार्ग, माहेश्वरी चौक, जुवी सांगवी ते बँक ऑफ महाराष्ट्र, कृष्णा चौकाकडून साई चौकाकडे जाणारा मार्ग २५ सप्टेंबर रोजी दुपारी चार ते रात्री बारापर्यंत बंद असणार आहे. या मार्गावरील वाहनांना पाण्याची टाकी, बँक ऑफ महाराष्ट्र, काटेपूरम चौक, बा. रा. घोलप महाविद्यालय-महात्मा फुले पुलामार्गे जाता येईल. वाकडमधील साठे चौक ते दत्त मंदिर रोड, म्हातोबा चौकातून जाणारा मार्ग २८ सप्टेंबर रोजी दुपारी चार ते रात्री बारापर्यंत बंद असणार आहे. कावेरीनगर, काळा खडक चौक, वाकड चौकातून कस्पटे कॉर्नर मार्गे जाता येईल. गोलारीस रुग्णालय चौकस, सम्राट चौक दत्त मंदिर रोड येथील वाहतूक गरजेनुसार वळवली जाणार आहे.
हेही वाचा : एटीएसची मोठी कारवाई : बेकायदा वास्तव्य करणाऱ्या तीन बांगलादेशींना अटक
चिंचवडगावात सर्व वाहनांना २८ सप्टेंबर रोजी दुपारी तीननंतर रात्री बारापर्यंत बंदी असणार आहे. दळवीनगर, वाल्हेकरवाडी, लिंकरोड मार्गे जाता येईल. हिंजवडीतील टाटा टी जंक्शन, जॉम्ट्रीक सर्कल, मेझा ९, शिवाजी चौक, कस्तुरी, जांभुळकर, इंडियन ऑइल चौकातून जाणारी वाहतूक २५, २७ आणि २८ सप्टेंबर रोजी दुपारी चार ते रात्री बारावाजेपर्यंत बंद असणार आहे. लक्ष्मी चौक, विनोदे वस्तीमार्गे जाता येईल. पिंपरी, काळेवाडी चौकाकडून शगुन, डिलक्स चौकाकडे जाणारी वाहतूक २३, २५ आणि २८ सप्टेंबर रोजी दुपारपासून रात्री बारावाजेपर्यंत बंद असणार आहे. पिंपरी काळेवाडी पुलावरून इच्छितस्थळी जाता येईल.