पिंपरी : पोलीस आयुक्तालयाच्याहद्दीत एकाच दिवशी सहा आत्महत्यांच्या घटनांची नोंद झाली आहे. चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत २७ जानेवारी रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास गौरव ज्ञानेश्वर अगम (वय २८) या तरुणाने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येच्या दुसर्‍या घटनेत प्रसाद संजय अवचट (वय ३१, रा. पुनावळे) या तरुणाने दुपारी साडेचारच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही. आत्महत्येच्या तिसर्‍या घटनेत विकास रामदास मुरगुंड (वय ३५, रा. गणपत लांडगे चाळ, भोसरी) या व्यक्तीने राहत्या घरात साडीच्या सहाय्याने गळफास घेतला. ही घटना २७ जानेवारी रोजी दुपारी बाराच्या सुमारास उघडकीस आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आत्महत्येच्या चौथ्या घटनेत मनाप्पा सोमल्या चव्हाण (वय ५२, रा. शिंदेवस्ती, नेरे, ता. मुळशी) यांनी घराशेजारील लिंबाच्या झाडाला डोक्याच्या पटक्याने गळफास घेतला. ही घटना २७ जानेवारी रोजी पावणेदहाच्या सुमारास घडली. नवनाथ भगवान पवार (वय ४६, रा. पवार चाळ, दत्तनगर, थेरगाव) यांनी राहत्या घराच्या शयनगृहात बेडशीटच्या सहाय्याने गळफास घेतला. ही घटना सोमवारी (दि. २७) मध्यरात्री पावणे एकच्या सुमारास उघडकीस आली. मात्र, मृत्यूचे नेमके कारण समजू न शकल्याने त्यांचा व्हिसेरा प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आला आहे.

आत्महत्येच्या सहाव्या घटनेत सुवर्णा श्रीराम पवार (वय ३६, रा. समीरा हाईटस्, ढोरेनगर, जुनी सांगवी) या महिलेने राहत्या घरव्त छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (दि. २७) रात्री बाराच्या सुमारास उघडकीस आली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

वाढत्या आत्महत्यांमुळे चिंता

वाढता ताणतणाव, मानसिक आजारपण याव्यतिरिक्त कर्जबाजारीपणा, कौटुंबिक वाद अशा वेगवेगळ्या कारणांमुळे शहरी आणि निमशहरी भागामध्ये आत्महत्या करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत आत्महत्या करणार्‍यांचे प्रमाण वाढत असल्याने सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pimpri chinchwad city 6 suicides in a day pune print news ggy 03 css