पिंपरी- चिंचवडमध्ये स्पा च्या नावाखाली वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या एका व्यक्तीसह महिलेला अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. रहाटणी परिसरातील अॅपल स्पावर छापा टाकून पोलिसांनी रोहन विलास समुद्रे वय वर्ष- ३४ आणि एका महिलेला ताब्यात घेतले आहे. त्याचबरोबर दोन पीडित तरुणींची सुटका करण्यात पोलिसांना यश आल आहे.
पिंपरी- चिंचवड शहरामध्ये स्पा च्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याच्या अनेक घटना समोर आलेल्या आहेत. त्याच अनुषंगाने अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने छापा टाकून दोन तरुणींची सुटका केली आहे. रहाटणी परिसरात अॅपल स्पा येथे स्पा च्या नावाखाली वेश्या व्यवसाय होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री करून छापा टाकला. या कारवाईत दोन पीडित मुलींची सुटका करण्यात आली आहे. तसेच वाकड पोलीस ठाण्यात रोहन विलास समुद्र आणि एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा… पिंपरी-चिंचवडवर आणखी पाणी कपातीची टांगती तलवार, पवना धरणात एवढेच पाणी शिल्लक
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, प्रदीप सिंह सिसोदे, सुनील शिरसाट, सुधा टोके, भगवंता, मारुती कचचुंडे, गणेश कारोटे, वैष्णवी गावडे, संगीता जाधव, रेश्मा झावरे आणि सोनाली माने यांच्या टीमने केली आहे.