पिंपरी- चिंचवड : शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी आज जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. मोर्चा आकुर्डी चौक ते तहसीलदार कार्यालय निगडी या मार्गावर काढण्यात आला. जातीनिहाय जनगणना करून सर्व मागासवर्गीयांना आरक्षण देण्यात यावे, शेतकरी पिक विम्याचे पैसे तत्काळ देण्यात यावे, बेरोजगार युवकांसाठी त्वरित नोकर भरती करण्यात यावी, पेट्रोल डिझेल व घरगुती वापराच्या गॅसचे दर त्वरित कमी करण्यात यावे, राज्यात सध्या गाजत असलेल्या अमली पदार्थांच्या घटनांवर नियंत्रण करून संबंधितांना कठोर शासन करण्यात यावे या प्रमुख मागण्यांसाठी आज हवालदिल झालेल्या जनतेच्या भावनांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि त्यांचा आक्रोश व्यक्त करणाऱ्या जन आक्रोश मोर्चाचे आयोजन काँग्रेसच्या वतीने करण्यात आले. या मोर्चा दरम्यान तहसीलदार कार्यालयासमोर निषेध सभेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी अखिल भारतीय युवक काँग्रेसचे प्रवक्ते गौरव चौधरी, ज्येष्ठ महिला नेत्या शामलाताई सोनवणे, कैलास कदम यांनी मनोगत व्यक्त केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा