पिंपरी- चिंचवड: पिंपरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुलक्षणा शीलवंत- धर यांची २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी उमेदवारी कशी कापण्यात आली, याबाबतचा खुलासा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल पिंपरी- चिंचवड मध्ये पार पडलेल्या महायुतीच्या बैठकीत केला. याच विधानावरून महाविकास आघाडीच्या उमेदवार सुलक्षणा शिलवंत- धर यांनी अजित पवारांवर नाराजी व्यक्त करत शेलक्या शब्दांत टोला लगावला आहे.

“लाडकी बहीण योजना राबविण्यापेक्षा लाडक्या बहिणीला सन्मान दिला असता तर आणखीनच कळवळा आला असता.” असं प्रत्युत्तर शीलवंत यांनी अजित पवारांना दिलं आहे. त्या पिंपरीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. अजित पवारांनी केलेल्या या विधानानंतर पिंपरी विधानसभा मतदारसंघातील राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघातून आमदार अण्णा बनसोडे यांना सुलक्षणा शीलवंत- धर यांचं आव्हान असणार आहे.

Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
Narendra modi BHIM UPI Babasaheb Ambedkar
“BHIM UPI चं नाव बाबासाहेबांच्या नावावर”, मोदींचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेने खोडून काढला? पुरावा देत म्हणाले…
Ashok Pawar and Rushiraj Pawar
Ashok Pawar : आमदार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण करून मारहाण केल्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ

हेही वाचा :पिंपरी : सहाशे रुपयांची लाच घेताना संगणक चालक महिला अटकेत

सुलक्षणा शिलवंत- धर म्हणाल्या, “२०१९ ला गुणवत्ता बघून तिकीट मिळालं होतं. अजित पवारांनी सांगितलं असतं की तू थांब, आपल्याला सुशिक्षित उमेदवाराची गरज नाही. मी नक्कीच थांबले असते. मी नक्कीच तुमचं ऐकलं असतं. अजित पवारांनी बैठकीत अशा पद्धतीने वक्तव्य करायला नको होतं. अजित पवारांच्या या वक्तव्याचा जनता नक्की बोध घेईल.” अशा शब्दांत शरद पवार गटाच्या उमेदवार सुलक्षणा शिलवंत – धर यांनी अजित पवारांना उत्तर दिलं आहे.

हेही वाचा :पिंपरी विधानसभा: फलकाद्वारे अजित पवारांच्या आमदाराला विचारण्यात आले विविध प्रश्न; गुन्हेगारी, वाहतूक कोंडीचा केला उल्लेख

नेमकं अजित पवार काय म्हणाले होते?

२०१९ मध्ये आमदार अण्णा बनसोडे यांना कसं तिकीट देण्यात आलं, आत्ताच्या शरद पवार गटाच्या उमेदवार सुलक्षणा शीलवंत- धर यांचं तिकीट कसं कापण्यात आलं याबाबत अजित पवारांनी खुलासा केला. शरद पवार गटाच्या आत्ताच्या उमेदवार यांना आमच्या पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात आला होता. पक्षाचं फारच शीलवंत यांच्यावर प्रेम होतं, ते का कुणास ठाऊक. असं म्हणत अजित पवारांनी अनेकांचे फोन आल्याने त्यांचं तिकीट कापून ऐनवेळी पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावरील मुकाई चौकात अण्णा बनसोडे यांना एबी फॉर्म देऊन तो सकाळी अकराच्या सुमारास भरण्यास सांगितला होता. त्यानंतर अण्णा बनसोडे हे पिंपरी विधानसभेतून विजयी देखील झाले होते, असा खुलासा अजित पवार यांनी केला आहे

Story img Loader