पिंपरी- चिंचवड: पुण्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. दगडाच्या खाणीत एक हात, पाय आणि मुंडक नसलेला मृतदेह पोलिसांना आढळला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटने प्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात प्राथमिक माहितीवरून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीताराम ढाले अस मृत व्यक्तीचं नाव आहे. ते जेसीबी चालक आहेत. ड्रोनद्वारे पोलिसांनी मृतदेहाचे गायब असलेले शरीराचे अवयव शोधण्याचा प्रयत्न केल्याचं पोलिसांनी सांगितले आहे.
सीताराम ढाले हे जेसीबी चालक आहेत. २९ मार्च रोजी ते घरातून बाहेर पडले. ते मोशीतील दगडाच्या खाणीच्या दिशेने जात असल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. ते घरी परतले नाहीत. अखेर ३१ मार्च रोजी सीताराम बेपत्ता असल्याची तक्रार भोसरी पोलिसात ठाण्यात देण्यात आली. तीन दिवसांनी मोशी येथील शंभर फूट खोल दगडाच्या खाणीत एक हात, पाय आणि मुंडक नसलेला मृतदेह असल्याची माहिती दिघी पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह सडलेल्या अवस्थेत होता. याबाबत ची माहिती जवळ च्या पोलीस ठाण्यात कळवण्यात आली. तेव्हा, भोसरी पोलीस ठाण्यात बेपत्ता म्हणून तक्रार देणाऱ्या सीताराम च्या पत्नीला आणि नातेवाईकांना बोलवण्यात आलं. घटनास्थवर मोबाईल फोन आणि कपड्यावरून सीताराम यांची ओळख पटली. प्राथमिक माहितीवरून चार एप्रिल रोजी दिघी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एक हात, पाय आणि मुंडके कुठे गेले?
सीताराम यांचा मृतदेह हा विना एक हात, पाय आणि मुंडकं नसलेल्या अवस्थेत मिळाला. अद्याप हे स्पष्ट नाही, की ते अवयव कापण्यात आले आहेत. की कुठल्या हिंस्त्र प्राण्याने खाल्ले आहेत. याचा तपास दिघी पोलीस करत आहेत. अवयव शोधण्यासाठी पोलिसांनी ड्रोन ची देखील मदत घेतली. तरीही अवयव सापडले नाहीत. सीताराम यांचं कुणाशी ही वाद नाहीत. वैर नाही. त्यामुळं ही हत्या आहे. आत्महत्या आहे, की ते शंभर फूट खोल दगडाच्या खाणीत चुकून पडले. याचा तपास पोलीस घेत आहेत.