पिंपरी- चिंचवड : येथे हाणामारी करत एक जण दुसऱ्याला चाकू मारत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एक जण रक्तबंबाळ झाल्याचं बघायला मिळत आहे. हा व्हिडिओ पिंपरी- चिंचवड शहरातील भूमकर चौकातील आहे. दिगंबर शिवाजी गायकवाड असे चाकूने हल्ला करणाऱ्या व्यक्तीचे नाव असून तो जखमी शिवप्पा अडागळे यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करतो. जखमी शिवप्पा हे दिगंबरला कामावरून काढणार होते. याच कारणावरून त्याने भर रस्त्यात चाकू हल्ला केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. दिगंबर गायकवाडला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्रीच्या सुमारास भर रस्त्यात शिवप्पा आणि दिगंबर यांच्यात वाद झाला. दोघांमध्ये हाणामारी झाली. दोघांनीही मद्य प्राशन केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. शिवप्पाकडे आरोपी दिगंबर हा ड्रायव्हर म्हणून काम करतो आहे. परंतु, शिवप्पा त्याला कामावरून काढून टाकणार होता. याची माहिती दिगंबरला मिळताच त्याने टेम्पो आणि त्याची चावी देण्यास नकार दिला होता. यावरून त्यांच्यात भररस्त्यात वाद झाले. दरम्यान भररस्त्यात हाणामारी झाल्यानंतर चालक दिगंबर गायकवाडने शिवप्पा यांच्यावर चाकू हल्ला केला. या घटनेत ते रक्तबंबाळ झाले.

combing operation parabhani
Parbhani : परभणीत रात्री पोलिसांकडून कोंबिंग ऑपरेशन? पोलीस म्हणाले, “परिस्थिती नियंत्रणात आणताना…”
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Thane Police begins work to record statement of former Director General of Police Sanjay Pandey
माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांचा जबाब नोंदविण्याचे काम ठाणे पोलिसांकडून सुरू
attack on police Nagpur, Nagpur, police Panchnama Nagpur,
हे काय चाललेय नागपुरात? पंचनामा करायला गेलेल्या पोलिसावरच हल्ला….
Mob attack on police to free accused arrested in gold chain theft case
मुंबई पोलिसांवर अंबिवली गावात दगडफेक, सोनसाखळी चोरीप्रकरणी अटक केलेल्या आरोपीला सोडवण्यासाठी जमावाचा हल्ला
Stock of village hand bombs seized in Thane news
ठाण्यात गावठी हात बाॅम्बचा साठा जप्त
mp akhilesh yadav allegations on up government for sambhal violence
संभल हिंसाचार सुनियोजित कट! अखिलेश यांचा आरोप; पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
Telangana Cop Killed by Brother Over Inter-Caste Marriage
Telangana Cop Murder : ऑनर किलिंग, संपत्तीचा वाद की…, पतीशी फोनवर बोलत असताना महिला पोलिसाची भावाकडून हत्या

हेही वाचा : पिंपरी- चिंचवडमध्ये ‘स्पा’च्या नावाखाली वेश्याव्यवसाय; पोलिसांनी टाकला छापा, दोन तरुणींची सुटका

रस्त्यावरील इतर नागरिकांनी त्यांचे वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. दिगंबरने चाकू हल्ला केल्यानंतर नागरिक घाबरले होते. तात्काळ शिवप्पाला रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं, तर दिगंबर गायकवाडला हिंजवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात ते हाणामारी करत असल्याचे आणि चाकू हल्ल्याचं स्पष्ट दिसत आहे.

Story img Loader