पिंपरी : शहरात गणपती विसर्जनाची धामधूम सुरू असताना वाकड परिसरात एका अज्ञाताने हवेत गोळीबार केल्याची घटना घडली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात गणपती विसर्जन मिरवणूक सुरू आहे. पिंपरी आणि चिंचवड परिसरातील गणरायाला निरोप दिला जात आहे. त्यातच वाकड परिसरात काही वेळापूर्वी अज्ञाताने हवेत गोळीबार केल्याची घटना घडली. गोळीबार झाल्याबाबत एका व्यक्तीने पोलीस नियंत्रण कक्षाला फोनद्वारे ही माहिती दिली.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
हेही वाचा : पिंपरी : मूर्तीदान उपक्रमाला प्रतिसाद; घरगुती गणपती विसर्जनासाठी घाटावर गर्दी
वाकडमधील विकास आराखड्यातील रस्त्यावर पांढर्या मोटारीतून येऊन एका व्यक्तीने हवेत गोळीबार केल्याबाबत माहिती मिळाली. वाकड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अधिक माहिती घेऊन कारवाई करीत असल्याचे पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी सांगितले.
First published on: 17-09-2024 at 20:49 IST
© IE Online Media Services (P) Ltd
© IE Online Media Services (P) Ltd
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pimpri chinchwad firing by unknown persons at phoenix mall kjp 91 css