पिंपरी चिंचवड : भाजपचे नेते गोपीचंद पडळकर हे आज पिंपरी- चिंचवडमध्ये घोड्यावर स्वार झाले. भाजप आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतातील सर्वात मोठे भव्य देशी गोवंश पशुप्रदर्शन आणि अश्व पशुप्रदर्शन भरवण्यात आले आहे. यासाठी भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी हजेरी लावली. यावेळी गोपीचंद पडळकर हे अश्वाची पाहणी करत असताना त्यांना घोड्यावर स्वार व्हायचा मोह आवरता आला नाही आणि ते थेट घोड्यावर स्वार झाले. या घोड्याचा लगाम मात्र आमदार महेश लांडगे यांच्याकडे होता. त्यामुळे साहजिकच चर्चेला उधाण आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : आठ वर्षीय सुरभी चंद्रपूरकरांना सांगणार मुखोद्गत पारायण

भाजप नेते गोपीचंद पडळकर हे त्यांच्या वक्तव्यासाठी आणि शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या विरोधात बोलणारे नेते म्हणून त्यांच्याकडे बघितले जात. गोपीचंद पडळकर हे निर्भीड टीका करण्यासाठी महाराष्ट्रातील राजकारणात प्रसिद्ध आहेत. याच गोपीचंद पडळकर यांना आज घोड्यावर स्वार होण्याचा मोह आवरता आला नाही. पिंपरी- चिंचवड शहरांमध्ये भाजप आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यापैकीच एक भारतातील सर्वात मोठे भव्य देशी गोवंश पशु प्रदर्शन आणि अश्व पशुप्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनाला भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी हजेरी लावली. देशी गोवंश आणि अश्व बघितले, तेव्हा गोपीचंद पडळकर यांना घोड्यावर बसण्याचा मोह आवरता आला नाही. ते घोड्यावर स्वार झाले, परंतु या घोड्याचा लगाम मात्र आमदार महेश लांडगे यांच्या हातात होता. यामुळे चर्चेला उधाण आले आहे.