पिंपरी चिंचवड : क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून दर महिन्याला दहा टक्के परतावा मिळवून देण्याच्या आमिषाने पिंपरी- चिंचवड मधील उच्चशिक्षित तरुणाची ८० लाख २७ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे उजेडात आले आहे. याप्रकरणी पिंपरी- चिंचवड सायबर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. अविनाश सिंग आणि रवी ठाकूर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघेही मार्केटिंग आणि साखळी पद्धतीने उच्चशिक्षित तरुणांना त्यांच्या जाळ्यात ओढत होते. याबाबत सेमिनार घेऊन त्यांना कशा पद्धतीने परतावा मिळू शकतो. याबद्दल ते पटवून द्यायचे.

सायबर गुन्हेगारी मध्ये अनेक उच्चशिक्षित तरुण अडकत असल्याचं वारंवार समोर येत आहे. पिंपरी- चिंचवड शहरातील उच्चशिक्षित असलेल्या तरुणाला क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून ८० लाख रुपयांना गंडा घातला आहे. आरोपी अविनाश सिंग आणि रवी ठाकूर हे ओरीस कॉइन कंपनीच्या माध्यमातून विविध उच्चशिक्षित तरुणांना आपल्या जाळ्यात ओढत, क्रिप्टोकरन्सीची कंपनी असल्याचं ते भासवायचे. दर महिन्याला दहा टक्के परतावा मिळवण्याच्या आमिषाने त्यांना पैसे गुंतवण्यास भाग पाडायचे. काही जणांना त्यांनी ते पैसे दिले. परंतु, फिर्यादी यांनी तब्बल ८० लाख रुपये त्यांच्याकडे गुंतवले होते. त्यांना तो परतावा मिळाला नाही. त्यानंतर त्यांची आर्थिक फसवणूक झाल्याचं समोर आलं. या प्रकरणानंतर फिर्यादी यांनी पिंपरी- चिंचवडच्या सायबर पोलिसांकडे धाव घेऊन याबाबत रीतसर तक्रार नोंदवली.

fraud in lic investment plans news in marathi
पिंपरी- चिंचवड: एलआयसीच्या प्लॅनमध्ये जास्तीचा परतावा मिळवून देण्याचा आमिषाने आर्थिक फसवणूक
Manoj Jarange, Manoj Jarange movement,
विश्लेषण : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा प्रभाव ओसरला?…
cyber crime news in Marathi update
सायबर फसवणूकीप्रकरणी ११ जणांना अटक
Online fraud of Rs 91 thousand on name of insurance
विम्याच्या नावाखाली ९१ हजारांची ऑनलाइन फसवणूक
CSR Scam
निम्म्या किमतीत मिक्सर, स्कूटर देण्याचे आमिष दाखवून २६ वर्षीय तरुणाने केली २० कोटींची फसवणूक
pune cyber crime latest news
पुणे : सायबर चोरट्यांकडून तरुणाची २५ लाखांची फसवणूक
Shanti Nagar police arrested gang diverting cyber fraud money into accounts of unemployed individuals
सायबर गुन्हेगारांचे पैसे अशिक्षित, बेरोजगारांच्या खात्यात, भिवंडी शहरातून सायबर गुन्हे करणारी टोळी गजांआड
cyber crime rising and engineers students and educated citizens becoming victim
सायबर गुन्हेगारांच्या ‘जाळ्यात’ उच्च शिक्षितच; गेल्या वर्षभरात किती तक्रारी?

हेही वाचा : पिंपरी : चपलेने मारल्याचा बदला घेण्यासाठी महिलेच्या घरात घुसून तोडफोड

सायबर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान याप्रकरणी अशी फसवणूक इतर कोणाची झाली असल्यास तात्काळ सायबर पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन देखील सायबर पोलिसांकडून करण्यात आलं आहे. या प्रकरणांमध्ये ओरिस कॉइन कंपनीचे मालक राहुल खुराना आणि तरुण त्रिका या दोघांचा सायबर पोलीस शोध घेत आहेत.

Story img Loader