पिंपरी- चिंचवड : चिखली कुदळवाडी परिसरात बिबट्या आल्याने एकच खळबळ उडाली आहे. आज पहाटे साडेपाचच्या सुमारास देहू- आळंदी रोडवरील चिखली जवळ बिबट्या काही नागरिकांना दिसला तसेच सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. यामुळे चिखली कुदळवाडी परिसरात भीतीचे वातावरण होते.
हेही वाचा : हिंजवडीत कंपनीतील गॅसभट्टीच्या स्फोटात २० कामगार जखमी; चार कामगारांची प्रकृती गंभीर
पिंपरी- चिंचवड शहरातील चिखली कुदळवाडी परिसरात बिबट्या दिसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. पहाटेच्या सुमारास बिबट्या दिसल्याने नागरिक भीतीच्या सावटाखाली आहेत. दरम्यान, बिबट्याला पकडण्यासाठी चिखली पोलीस, वनविभाग घटनास्थळी दाखल झाले असून सहा तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बिबट्याला जेरबंद करण्यात आले आहे. आज सकाळी बिबट्या काही व्यक्तींना दिसला, त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला तसेच व्हाॅट्सअॅपवर सर्व नागरिकांना सतर्क केलं. बिबट्याचा एक सीसीटीव्ही व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.